एक्स्प्लोर

पत्नीवर संशय, भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्यांवर एसआरपीएफ जवानाचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, बार्शीतील घटना

Solapur News Update : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एसआरपीएफ जवानांने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात ही घटना घडली

सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एसआरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात काल रात्री पावणे अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी असल्याची माहिती देखील मिळते आहे. 

नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी जवान गोरोबा तुकाराम महात्मे यास पोलिसांनी अटक केलीय. गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतूस देखील पोलिसांनी केली जप्त केली आहेत. 

एसआरपीएफ जवान गोरोबा महात्मे हे सध्या मुंबईत एका ज्येष्ठ सरकारी वकिलांचे सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहे. काही दिवसांपासून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडणं सुरू होती. महात्मे यांना आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पती-पत्नीतील हा वाद संपवण्यासाठी सासरकडील मंडळी काल गोरोबा महात्मे यांच्या घरी गेली होती. मात्र याच वेळी गोरोबा महात्मे यांना संताप अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यांनी भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या व्यक्तींवर आपल्या सरकारी पिस्टलमधून चार राउंड फायर केले. यामध्ये त्यांच्या मेहुण्याचे मित्र नितीन भोसकर यांचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला आहे. तर  बालाजी महात्मे हे या गोळीबारमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि पिस्टल जप्त करण्यात आली.  सरकारी पिस्टलचा वापर करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी जवान गोरोबा महात्मे विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संहिता कलम 302, 307, 504 आणि शस्त्र अधिनियम कलम 3,25,27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
मोठी बातमी : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची केली प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Ravi Pandit Passes Away: पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Embed widget