एक्स्प्लोर
पाण्याच्या टबमध्ये बुडून माढ्यात एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
दुर्वा शिंदे ही एक वर्षांची बालिका घराजवळ खेळताना ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली.
![पाण्याच्या टबमध्ये बुडून माढ्यात एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू Solapur : Baby dies after drown in water tub latest update पाण्याच्या टबमध्ये बुडून माढ्यात एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/01152831/Water-tub.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधीक फोटो
पंढरपूर : पाण्याच्या टबमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापुरात समोर आली आहे. दुर्वा सायबू शिंदे या एक वर्षाच्या बालिकेला प्राण गमवावे लागले.
सोलापुरातील माढा शहरामध्ये शिवाजीनगर भागात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. सायबू मारुती शिंदे हे शिवाजीनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची सर्वात धाकटी मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली.
शेजाऱ्यांनी दुर्वाला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दु्र्वाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सायबू शिंदे हे आसपासच्या गावांमध्ये यात्रेत हातातील कडं, कानातील कुंडल अशा वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. दुर्वाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)