एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 13 जुलै 2019 | शनिवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पूर्वलक्षी प्रभावाने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, पुढच्या सुनावणीपर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार
2. उघड्या गटारात वाहून गेलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबवला, 48 तासांनंतरही न सापडल्याने महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचा निर्णय
3. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते संपर्कात, भाजपवासी राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा, कर्नाटक-गोव्यानंतर भाजपने महाराष्ट्र काँग्रेसकडे मोर्चा वळवल्याची चर्चा
4. नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात संरक्षक जाळीसह दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरु, अद्याप जीवितहानीची माहिती नाही
5. औरंगाबादच्या गंगापूरमध्ये आगळ्या-वेगळ्या अळीची चर्चा, झुंडीने चालताना सापाप्रमाणे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती, कृषी अधिकारीही अचंबित
6. गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाचा नियम मोडणाऱ्या मंडळांना अनोखी शिक्षा, 39 मंडळांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड, कोर्टाच्या आवारात एक-एक रोपटं लावण्याचेही आदेश
7. चेन्नईची तहान भागवण्यासाठी वेल्लोरहून रेल्वेने पाणी, 217 किलोमीटरचा प्रवास करुन 50 वॅगन्समधून 25 लाख लीटर पाण्याची वाहतूक
8. चीनच्या सैनिकांकडून भारतीय हद्दीत घुसखोरी, विरोधानंतर माघार, तर भारताने लढाऊ विमानं मागे घेतली तरच हवाई मार्ग खुला करणार, पाकचा आडमुठेपणा
9. अभिनेता विवेक ओबेरॉय ट्वीटमुळे पुन्हा टीकेचा धनी, विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवानंतर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांचा संताप
10. धोनीला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर न पाठवणं, हा टीमने सर्वानुमते घेतलेला निर्णय, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement