एक्स्प्लोर
रुमचा स्लॅब कोसळला, इम्तियाज जलील थोडक्यात बचावले

मुंबईः एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील एका दुर्घटनेत थोडक्यात बचावले. मुंबईतील नरीमन पॉईंट येथील आमदार निवासात स्लॅब कोसळल्यामुळे जलील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्य मतदार संघाचे आमदार आहेत. मुंबईत कामानिमीत्त आले असता ते आमदार निवास येथे थांबले होते. त्यावेळी स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली.
इम्तियाज जलील यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेत कसलीही जिवीतहानी झाली नाही.
इम्तियाज जलील यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेत कसलीही जिवीतहानी झाली नाही. आणखी वाचा























