Sangli News : आटपाडी तालुक्यातील खरसुंडीत सिद्धनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बंद; बेमुदत धरणे आंदोलन सुरु
Sangli News : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिराभोवतीचे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी खरसुंडीमधील सर्व व्यवहार गावकऱ्यांनी बंद ठेवले. मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन देखील सुरू केले आहे.
Sangli News : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिराभोवतीचे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी खरसुंडीमधील सर्व व्यवहार गावकऱ्यांनी बंद ठेवले. काही ग्रामस्थांनी या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन देखील सुरू केले आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मुख्य पेठेत जागा खुली करून मिळावी, अतिक्रमण करून अधिकृत झालेली प्रवेशद्वारासमोरील बांधकामे त्वरित काढावीत. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दुकानांनी सावलीसाठी केलेले छत त्यांच्या घराच्या आत असावे. मुख्य पेठेतील सर्व मिळकती व सर्व प्रॉपर्टी कार्डे महाराष्ट्र शासन अखत्यारीत वर्ग ब आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाचा कब्जा आहे. त्यामुळे यावर थेट कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे, तरी ग्रामपंचायत प्रशासन व देवस्थान ट्रस्टने अतिक्रमणे हटवून भक्तांना दर्शन घेताना होत असणारा त्रास थांबवण्याची मागणी करण्यात आली.
श्री सिद्धनाथ मंदिरासमोरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मुख्य पेठेतील अतिक्रमण हटवून भक्तांना मंदिराचे प्रवेशद्वार खुले करावे, अशी मागणी ग्रामपंचायत, तहसीलदार व पोलीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, अतिक्रमण हटवण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या