एक्स्प्लोर

दुकानं आणि आस्थापना आता आठवडाभर सुरु राहणार!

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 हा अधिनियम 19 डिसेंबर, 2017 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

नागपूर : नवीन अधिनियमामध्ये दुकान आणि आस्थापनांना आठवड्यातील 7 दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तेथील कामगारांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी देणं बंधनकारक असेल. लघू आणि छोट्या उद्योगांना याचा फायदा होणार आहे. या अधिनिमाअंतर्गत 10 पेक्षा कमी कामगार आहेत अशा आणि लघू व छोट्या आस्थापनांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी त्यांनी व्यवसाय सुरु केल्याबाबत केवळ विहीत कागदपत्रासह व्यवसाय सुरु केल्याची ऑनलाईन सूचना द्यायची आहे. त्या अर्जाची पोहोच पावती ऑनलाईन उपलब्ध होईल. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 हा अधिनियम 19 डिसेंबर, 2017 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी ) आणि इतर आस्थापनांना, तेथील कामगारांना या अधिनियमाच्या तरतुदींचा लाभ होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवसाय 24 तास कार्यरत असतात. त्यामुळे ऑफलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्याशी सकारत्मक स्पर्धा करता यावी म्हणून या अधिनियम लागू करण्यात आला. आता कामगार नसलेल्या सुमारे 22 लाख आस्थापना मालकांना यातून सूट मिळणार आहे.  तसेच सुमारे 12 लाख आस्थापना, ज्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार आहेत, त्यांना या अधिनियमाच्या आस्थापना उघडणं आणि बंद करण्याच्या व इतर तरतुदीतून सूट मिळाली आहे. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी आणि त्यात वृध्दी होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल. पर्यायाने तेथे अधिक कामगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.  या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सुमारे 35 लाख कामगारांना किमान वेतन तसेच औद्योगिक विवाद अधिनियमाच्या तरतूदी लागू राहतील. या अधिनिमाअंतर्गत कामगार हितार्थ अनेक तरतूदी आहेत.  जसं की, ओळखपत्र देणं, प्रसाधन गृह, पाळणाघर, उपहारगृह या सोयी पुरवणं मालकांना बंधनकारक केलं आहे.  राज्यातील दुकाने आणि आस्थापनेतील कामगारांना नैमित्तीक रजेची सवलत प्रथमत:च मिळाली आहे. या अधिनियमांतर्गत 08 नैमित्तिक रजा देणं बंधनकारक आहे.  या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा आहे. महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांच्या घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत सुरक्षित वाहन व्यवस्था, कामाच्या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता बाबत पुरेशा स्वरंक्षण असेल अशा ठिकाणी महिलांना त्यांच्या संमतीने रात्री 9.30 नतंर काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Girish Mahajan: 'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Embed widget