एक्स्प्लोर

Latur News : निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात राहिला चक्क तीन महीने दीड बाय एक फुटाचा कापड

Latur News : लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Latur News लातूर : लातूर (Latur News) जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Ausa) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा येथे शस्रक्रिया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे तीन महिने कापडी नॅपकिन पोटात राहिल्याने ही महिला मरणाच्या जबड्यातून थोडक्यात बचावली आहे. हबीबा वसीम जेवळे असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला तीन महिन्यांपूर्वी प्रसूतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर 23 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र बाळ बाहेर काढल्यावर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडी नॅपकिन मध्येच ठेवून टाके घेण्यात आले.

पोटात चक्क दीड बाय एक फुटाचा कापड  

दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिलेच्या पोटातून पाणी येत असल्याने हबीबा ही महिला पुन्हा औसा ग्रामीण रुग्णालयात आली असता, येथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे या महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले. तरीही टाक्यातून पाणी येत असल्याने औशातील दोन खाजगी डॉक्टरांचा उपचार या महिलेने घेतला. मात्र, टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले. सोनोग्राफी, सीटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता पोटात गाठ नाही तर चक्क दीड बाय एक फुटाचा कापड (मॉब) निघाला. हा कापडी नॅपकिन औशाच्या रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे. मात्र, या निमित्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून निष्काळजीपणाचा कळस औसा ग्रामीण रुग्णालयाने गाठला असल्याचे बोलले जात आहे.

चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार 

तर दुसरीकडे या प्रकरणी औसा ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारतकुमार थडकर म्हणाले कि, पोटात नॅपकिन निघालेल्या महिलेल्या प्रकरणावरून रूग्णालय  प्रशासन गंभीर आहे. या  संदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget