एक्स्प्लोर

बीड: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवले; गुटखा तस्करी प्रकरणात दाखल आहे गुन्हा

Shivsena : गुटखा तस्करी प्रकरणी आरोपी असलेल्या कुंडलिक खांडे यांना शिवसेनेने जिल्हा प्रमुख पदावरून हटवले आहे.

Shivsena Beed district chief : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. गुटख्याच्या व्यवसायामध्ये कुंडलिक खांडे यांचाही सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता

या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील असे म्हटले आहे.

कुंडलिक खाडे विरोधात अवैध गुटखा प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस रेकॉर्डवर फरार आरोपी म्हणून नोंद आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वागताला हजर राहिला होता. बीड पोलिसांकडून सामान्य जनतेला एक न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या आरोपीला वेगळा न्याय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.  

खासदार अनिल देसाई यांना याबाबत विचारले असता त्यांनी या प्रकरणात कुंडलिक खांडे वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब लवकरच कारवाईचा निर्णय घेतील. त्यांच्यावर आरोप आहेत चौकशी सुरू आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कारवाई केली जाईल असे म्हटले. 

गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

मला या प्रकरणात गुंतवले जात आहे तसेच कलम 169 नुसार माझे नाव या प्रकरणातून वगळण्यात येणार आहे तसे पोलिसांनी मला सांगितले असल्याचे कुंडलिक खांडे यांनी या कार्यक्रमानंतर सांगितले होते. मला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

एसटी संप: शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली, 'या' मुद्यांवर झाली चर्चा

परळीचे वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचे शंकराचार्यांचे वक्तव्य; वादावर पडदा पडणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 3 July 2024 : ABP MAJHATeam India in India : टीम इंडिया ITC मौर्यामध्ये दाखल, हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दीABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM 04 July 2024 Marathi NewsTeam India in Delhi : Virat Kohli, Suryakumar Yadav ची दिल्ली विमानतळावर पहिली झलक | T20 World Cup

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Marathi Serial Updates Tharal Tar Mag!  : 'ठरलं तर मग!' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय
'ठरलं तर मग!' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय
Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
Embed widget