एक्स्प्लोर
गांधींचा फोटो हटवणं म्हणजे मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल : शिवसेना
मुंबई : खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र छापल्याने, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने टीका केली आहे. नरेंद्र मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा घणाघात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.
अडसूळ म्हणाले की, "महात्मा गांधी आदर्श असल्याचं मोदी म्हणतात. पण आदर्शालाच नष्ट करणं दुर्दैवी आहे. नोटाबंदी निर्णयाच्या वेळी मंत्रिमंडळाला विश्वासात न घेणं, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरलाच कल्पना न देणं, कोणतीही पूर्वतयारी न केल्याने जनतेला मनस्ताप झाला, हे हुकूमशाहीचं प्रतिक आहे."
देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरुन महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आलं. मात्र या प्रकाराचा सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. तसंच सामाजिक क्षेत्रातही नाराजी व्यक्त केली जात आहे. हे मनोविकाराचं लक्षण : विश्वंभर चौधरी गांधी खेळणं नाही, कधीही उचलावं आणि बाजूला काढावं. खादीची चळवळ गांधीजींनी सुरु केली होती. मोदींच्या आकलनाचीच कमाल वाटते. चरखा म्हणजे गांधी असं ते समजतात. पण चरखा स्वावलंबनाचं प्रतिक होतं. मोदींनी स्वावलंबनाविषयी बोलू नये. जो मनुष्य स्वत: दहा लाखाचे कपडे घालतो, त्याने साधेपणा आणि गांधींबद्दल बोलणं यासारखा दुसरा विकार नाही. हे मनोविकाराचं लक्षण असल्याचं मला वाटतं, अशा तीव्र शब्दात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी निषेध केला आहे.खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर, डायरीवर गांधींऐवजी मोदींचा फोटो
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा निषेध विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला. पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला आमचा विरोध नाही, तर गांधीजींचा फोटो हटवण्याला आक्षेप आहे, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. सेवाग्राममधील गांधीवाद्यांची तीव्र नाराजी दरम्यान वर्ध्याच्या सेवाग्राममधील गांधीवाद्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खादी ग्रामोद्योगच्या डायरी आणि कॅलेंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापणं चुकीचं असून मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी गांधीवाद्यांनी केली आहे. फोटो छापला तर चुकीचं काय? खादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच योगदान आहे. दहा वर्षात खादीच्या विक्रीत 2 ते 7 टक्क्यांनीच वाढ झाली होती. पण मोदींच्या आवाहनानंतर 2015-16 मध्ये खादीच्या विक्रीत 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाही खादीची विक्री चांगली झाली आहे. जर त्यांचा फोटो छापला तर चुकीचं काय?, असा सवाल खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी विचारच मोदींचं समर्थन केलं आहे. फोटोमुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? : रावसाहेब दानवे मोदींनी खासदार, आमदारांना खादी वापरण्याचं आवाहन केलं. जो माणूस खादीचा प्रचार करतो, खादी वापरण्याचं आवाहन करतो, त्याचा फोटो वापरल्यावर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? फोटोवरुन वाद का?, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मोदींचा फोटो छापल्याबाबत पाठिंबा दर्शवला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement