Shivsena Sanjay : आयोध्येशी आमचा काय संबंध आहे हे रामाला माहिती; खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला
मुंबईत ज्यावेळी दंगल झाली होती त्यावेळी शिवसेनेने मुंबईला वाचवलं होतं, शेकडो शिवसैनिकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्यावेळी भाजप कुठे होतं असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. रामलल्ला प्रकरणी शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक अशीच आहे. ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा थंड पडला होता त्यावेळी शिवसेनेने तो मुद्दा उचलला. अनेक शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे आयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे असा टोला शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
राम मंदिराच्या लढ्यात फक्त शिवसैनिक पुढे होता. त्यावेळी सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुंबईत ज्यावेळी दंगल झाली होती त्यावेळी शिवसेनेने मुंबईला वाचवलं होतं, शेकडो शिवसैनिकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्यावेळी भाजप कुठे होतं?"
भाजपच्या जन्माआधीच शिवसेनेचा नगरसेवक मुंबईत निवडून आला होता. जर भाजपच्या काही लोकांचं यावर विस्मरण झालं असेल तर त्यावर आम्ही एक शिबीर घेऊ असाही टोला संजय राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपवर सडकून टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेवर टीका केली. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा इतिहास त्यांनी मांडला. आता देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
आयोध्येत राम मंदिर होतंय त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातंय असं भाजपने म्हटलं आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराचे श्रेय हे मोदींचं नसून सर्वोच्च न्यायालयाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का?, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- निवडणूक व्हिडीओ व्हॅनच्या वापरास परवानगी पण एकाच जागी 30 मिनीटांवर थांबणार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाची नवीन नियमावली जाहीर
- सचिन वाझेला ओळखत नाही, अनिल देशमुखांचा चांदिवाल आयोगासमोर जबाब