भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये सरकारी यंत्रणांचा गैरवापर : संजय राऊत
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नाही, असा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय योग्य असल्याचंही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
मुंबई : भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच, बिगर भाजप शासित राज्यांमध्ये यंत्रणेंचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नाही, असा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय योग्य असल्याचंही संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, 'महाराष्ट्र आहे, सीबीआय असेल, ईडी असेल यांना थोडेफार तपासाचे अधिकार आहेत. त्या अधिकारांचा गैरवापर, जिथे विरोधकांची राज्य आहेत, आपल्या विचारांची राज्यं नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कोणी करत असेल तर नाईलाजाने राज्याच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पश्चिम बंगालमध्ये हा प्रसंग आला आहे. आंध्रमध्येही आहे. अजून एकदोन राज्यामध्येही आहे. महाराष्ट्र शेवटचं राज्य आहे. संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच हा निर्णय झाला."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "मुंबई पोलिसांनी तपास करायला घेतला आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचले की ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास जायचा. कुठेतरी वेगळ्या राज्यात गुन्हा दाखल करुन तपास हातात घेतात आणि मग महाराष्ट्रात घुसतात. हे किती काळ चालणार. शेवटी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्याचं मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. येथील तपास यंत्रणाही तेवढ्या सक्षम आहेत."
पाहा व्हिडीओ : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा सावरकर स्मारक सभागृहात होणार : संजय राऊत
दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनाची संमती घेणं अनिवार्य असणार आहे. राज्याच्या गृह विभागाने बुधवारी यासंबंधीचे राजपत्र प्रसिद्ध केलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणात थेट चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला होते. पण आता सीबीआयला परवानगी घ्याली लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे सीबीआयकडे आधीच असलेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवर काहीही परिणाम होणार नाही. कारण ही चौकशी आधीच सुरु करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात दोन महिन्यानंतरही CBI च्या हाती काहीच नाही!