एक्स्प्लोर

निवडणूक आयोग म्हणजे तवायफ : संजय राऊत

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. निवडणूक आयोग म्हणजे तवायफ असल्याचं राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील पालघर आणि गोंदिया-भंडारासह देशातील चार लोकसभा मतदारसंघांतील जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक झाली होती. पालघर, गोंदिया-भंडारा आणि उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) आणि व्होटर वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उष्णतेच्या लाटेमुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भंडारा- गोंदिया फेरमतदान: आजही मतदान यंत्रात बिघाड
'पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांना पैशाचं वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं होतं, मात्र निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. जर देशभरात निवडणूक आयोग अशीच निष्क्रियता दाखवत असेल, तर याचा अर्थ निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या तवायफसारखी वागत आहे.' असं खासदार संजय राऊत 'एएनआय'शी बोलताना म्हणाले. 'नागरिकांचा मतदार पद्धतीवरचा विश्वास उडत चालला आहे' अशी पुष्टीही राऊत यांनी जोडली. खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भंडारा-गोंदिया, तर भाजप खासदार श्रीनिवास वनगा यांच्या निधनानंतर पालघर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. 28 मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली आहे. उद्या, म्हणजे 31 मे रोजी सर्व लोकसभा पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या 

गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी फेरमतदान 

पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 42 टक्के मतदान

पालघर पोटनिवडणूक : सात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget