एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधवांच्या 'त्या' कृतीचीच चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सत्कारावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीने चर्चांना उधाण आलंय.
रत्नागिरी : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच कोकण दौरा. पण, या दौऱ्यात भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गणपतीपुळेला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते विकास आराखड्याच्या कामांचं भुमिपुजन करण्यात आलं. या साऱ्यामध्ये चर्चा रंगली ती भास्कर जाधव यांच्या नाराजीची. जाहीर सभेवेळी उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, यावेळी भास्कर जाधव यांनी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्कारावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उद्य सामंत, पालकमंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे आणि भास्कर जाधव देखील हजर होते. उद्धव ठाकरे यांचा सत्कार करताना त्यांना विनायक राऊत यांनी हात धरत जवळ बोलावले. पण, त्यांनी राऊत यांचा हात झटकला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील व्यासपाठावर हजर होते. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या नाराजीचीच चर्चा जोरदार सुरू झाली आहे. जाधव यांची नाराजी समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील जाधव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलावून दाखवली आहे.
सरकार तुम्ही चालवा पण, कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
अधिकाऱ्यांवर ओरडले, पत्रकारांना उत्तरं देणं टाळले
यापूर्वी जिल्हा आढाला बैठकीला देखील भास्कर जाधव यांची नाराची चर्चेत आली होती. पालकमंत्री म्हणून अनिल परब पहिल्यांदाच रत्नागिरीत आले होते. त्यावेळी देखील जाधव गैरहजर होते. आजच्या दौऱ्यावेळी देखील जाधव अधिकाऱ्यांवर ओरडताना आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळताना दिसत होते. त्यामुळे 'भास्कर जाधवांचा मुड काही ठिक नाही' अशी चर्चा पत्रकार वर्तुळा रंगली होती.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराजी?
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शिवसेना असा भास्कर जाधव यांचा प्रवास आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाधव यांना मनगटावरचं घड्याळ सोडत शिवबंधन बांधलं होतं. शिवसेना सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा भास्कर जाधव यांना होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं जाधव नाराज होते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी यापूर्वी बोलून दाखवली होती.
कोकणातील प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती; आदित्य ठाकरेंचा निर्णय
काय करणार उद्धव ठाकरे?
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानं त्याला आणखी बळकटी आली. पण, आता मात्र जाधव यांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे जाधव यांची नाराजी कशी दूर करणार? अशी चर्चा कोकणातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
CM Konkan Tour | उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा, मुख्यमंत्री झाल्यानंतरचं उद्धव ठाकरेंचं कोकणातील पहिलं भाषण!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement