एक्स्प्लोर
सरकार तुम्ही चालवा पण, कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
उद्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केलीय. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पर्यटन दौरा असल्याचे त्यांनी म्हटलंय.
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधीच कोकणात शिमगा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केलीय. उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा नसून पर्यटन दौरा आहे. यात फक्त घोषणाबाजी होणार असून यात कोकणवासीयांना काहीच मिळणार नसल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे जे करायचं ते केलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तुमचं सरकार तुम्ही चालवा पण, कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या, अशी विनंतीही आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना केलीय.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याआधीच भाजप आमदार नितेश राणे यांनी या दौऱ्यावर टीका केलीय. उद्या कोकणात होणाऱ्या बैठकीला मिनी कॅबिनेट बोलत आहेत. मात्र, नारायण राणे यांनी सरकारमध्ये असताना कोकणात कॅबिनेट बैठक घेतली होती आणि कोट्यवधींचा निधी आणला होता. तेव्हा उद्धव ठाकरे ही पुर्नरावृत्ती करणार का? असा सवालही नितेश राणे यांनी मुख्यंत्र्याना केलाय.
हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान
कसा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा -
रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत, त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजुर झालेल्या सुमारे 102 कोटींच्या विकासकामांमधील प्रमुख कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडाबाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे उद्धव ठाकरे सुट्टीवर : नितेश राणे
नाणारवर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये शनिवारी कोकण आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर रिफायनरीची माहिती देणारी जाहिरात आल्याने शिवसेनेची भूमिका बदलली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nanar Refinery | नाणारवासीयांची सामनाच्या कार्यालयात धडक, शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement