एक्स्प्लोर
युती मोडाल, तर सेनेचं सर्जिकल स्ट्राईक दाखवू : उद्धव ठाकरे
मुंबईः शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सर्जिकल स्ट्राईक, मराठा आरक्षण, कार्टून वाद आणि आगामी महापालिकेच्या निवडणुका या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली.
सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर अभिनंदनः उद्धव ठाकरे
भारताने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलं. भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी उद्धव ठाकरेंनी जाहीर अभिनंदन केलं. यावेळी रेसकोर्सवर 'वॉर म्युझियम' बनवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
दुसरीकडे या सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेत त्याचं राजकराण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. कठिी परिस्थितीत भारतीय जवान सीमेवर देशाचं रक्षण करतात. कोणताही भारतीय त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकवर कारवाईवर संशय घेणाऱ्यांचे मेंदू सडलेले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा समाचार घेतला.
युती तोडा आणि अंगावर याः उद्धव ठाकरे
राज्यभरातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपला सूचक इशारा दिला. हिंमत असेल तर युती तोडा आणि मग अंगावर या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
शिवसेना विधानसभेच्या वेळी गाफिल राहिली. कारण 25 वर्षांपासूनचा मित्र पाठिवर वार करिन असा विचारही केला नव्हता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युतीसाठी मागे लागणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
माता भगिनींची माफी मागितली, सोनिया गांधींची नाही, विखे पाटलांना टोला
'सामना'मधील कार्टूनचा वाद केवळ राजकारण करण्यासाठी पेटवला गेला. तरीही माता भगिनींच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी शिवसेनेने जाहीर माफी मागितली, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी कार्टून वादानंतर मराठा समाजाची माफी मागितल्यानंतरही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर टीका केली होती. आपण माता भगिनींची माफी मागितली, सोनिया गांधींची नाही, अशा शब्दात विखे पाटलांना टोला लगावला.
जातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण द्याः उद्धव ठाकरे
राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. आरक्षण हे जातीपेक्षा आर्थिक निकषांवर देणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शाळेत फी भरायला पैसे नसल्यामुळे आजोबा आणि बाळासाहेबांना शाळा सोडावी लागली होती, असं उदाहरणही उद्धव ठाकरेंनी दिलं.
अट्रॉसिटीमुळे कोणावर अन्याय होत असेल तर सर्वांशी चर्चा करुन कायद्यात बदल अपेक्षित आहे, असं मतही उद्धव ठाकरेंनी मांडलं.
लाईव्ह अपडेटः
- मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी आम्ही मागे लागणार नाही, भाजपला इशारा
- शिवसेना 50 वर्षांपासून तशीच आहे, जशी बाळासाहेबांनी सुरु केलीः उद्धव ठाकरे
- व्यंगचित्राचा वाद विनाकारण पेटवला गेलाः उद्धव ठाकरे
- माता-भगिनींची माफी मागितली, सोनिया गांधीची नाही, उद्धव ठाकरेंची विखे-पाटलांवर टीका
- केंद्रातलं सरकार ही देशवासियांची शेवटची आशा आहे, ही आशा यशस्वी व्हावी हीच प्रार्थनाः उद्धव ठाकरे
- कुणावर अन्याय होत असेल, तर अॅट्रॉसिटीत सर्वानुमते बदल झालाच पाहिजेः उद्धव ठाकरे
- जातीपेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण द्याः उद्धव ठाकरे
- शाळेत फी भरायला पैसे नव्हते म्हणून आजोबा आणि बाळासाहेबांनी शाळा सोडलीः उद्धव ठाकरे
- एकत्र निवडणुका घ्या पण मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी कुणा एका पक्षाच्या व्यासपीठावर जायला नकोः उद्धव ठाकरे
- अंगावर येणाऱ्यांना साफ करणं ही शिवरायांची शिकवण आहेः उद्धव ठाकरे
- रेसकोर्सवर वॉर म्युझियम बनवाः उद्धव ठाकरे
- कठिण परिस्थितीत सैनिक सीमेवर देशाचं रक्षण करतात, आणि हे लोक त्याचे पुरावे मागतातः उद्धव ठाकरे
- ज्यांनी ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेतला त्यांच्यात भारत मातेचं रक्त नाही, त्यांना हद्दपार कराः उद्धव ठाकरे
- आता फक्त सर्जिकल स्ट्राईकवरुन थांबू नका, मोदीजी पाकव्याप्त काश्मीरच नाही, पाकिस्तानसुद्धा हिंदुस्थान म्हणून जगाच्या पाठीवर ओळखला जाईलः उद्धव ठाकरे
- पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर अभिनंदनः उद्धव ठाकरे
- शिवाजी पार्कचं मैदान आणि मैदान गाजवणारा नेता एकाच साली म्हणजे 1927 साली जन्मले - उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- युती तोडा आणि अंगावर या- उद्धव ठाकरे
- विधानसभेला जरा गाफिल राहिलो, 25 वर्षांच्या मित्राने पाठिवर वार केला, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
- हा शिवसेनेचा 50 वा दसरा मेळावा, सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छाः उद्धव ठाकरे
- आज सोन्याची देवाण घेवाण करण्याची परंपरा आहे. मात्र शिवसेना प्रमुखांनी तुमच्या रुपात मला अमुल्य सोन दिलंयः उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement