एक्स्प्लोर
सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी सेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे, तर पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अद्यापही खलबतं सुरु आहेत.
मुंबई : शिवसेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना' असं सुरु झालं आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी सेना- भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे, तर पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अद्यापही खलबतं सुरु आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर तीन जागांवर भाजप उमेदवार देणार आहे.
नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे.
कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे
उस्मानाबाद-लातूर-बीड मधून सुरेश धस, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजे 3 मे असून 21 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे, पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीवर अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपला पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहायचं याबाबत शिवसेनेत खल सुरु आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement