एक्स्प्लोर

Shivjayanti 2022 : आज तिथीनुसार शिवजयंतीचा सर्वत्र उत्साह, मनसेकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन

Shivjayanti 2022 : 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे

Shivjayanti 2022 In Mumbai Maharashtra : 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे. दरम्यान राज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झाला आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी होणार असल्याचं सांगण्यात आलं असून अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करत आहे. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.

मनसेकडून अशी साजरी होणार शिवजयंती

:- प्रत्येक विभागात शिवजयंती साजरी होणार 
:- दादरमध्ये महिलांची रॅली निघणार 
:- मुंबईभरातले मनसैनिक पार्कात एकवटणार 
:- राज ठाकरे सहकुटुंब पार्कात उपस्थित राहणार 
:- विभागवार शिवजयंतीचे रथयात्रा निघणार आहेत 

महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी  करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होणार आहे.

अभिजित पानसे आणि सचिन मोरे करणार पुष्पवृष्टी

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पक्षाचे नेते अभिजित पानसे आणि सचिव सचिन मोरे हे करतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांनी दिली आहे या सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त, मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील असा विश्वास अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा-

 LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget