एक्स्प्लोर
Advertisement
महाराजांकडून स्वराज्य स्थापना तोरणावर नव्हे, चंदन-वंदनगडावर?
महाराजांनी 1646 साली तोरणा किल्ला काबीज केला. पण त्याआधी 1642 साली महाराजांनी चंदन-वंदन किल्ल्यावर स्वराज्याची सुरुवात केल्याचा दावा अभ्यासकांचा आहे.
पुणे : स्वराज्य स्थापनेचा विषय निघाला की तोरणा किल्ल्याचं नाव निघतंच. तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधले असं आपण इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिकलो. पण याच माहितीला छेद देणारा दावा केला जात आहे.
स्वराज्याची मुहूर्तमेढ तोरणा किल्ल्यावर नाही, तर चंदन-वंदन गडावर झाल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. महाराजांनी 1646 साली तोरणा किल्ला काबीज केला. पण त्याआधी 1642 साली महाराजांनी चंदन-वंदन किल्ल्यावर स्वराज्याची सुरुवात केल्याचा दावा अभ्यासकांचा आहे.
भुईंजपासून 15 किमी अंतरावर असलेला हा किल्ला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. सध्या प्रचलित असलेल्या बखरी छत्रपती शिवरायांनंतर शंभर वर्षांनंतर लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे खाफीखान अधिक समकालीन आहे असं चंदनकरांचं म्हणणं आहे.
तोरणा किल्ला कब्जात घेताना शिवरायांचं वय 16 वर्षे होतं. पण शिवरायांच्या स्वराज्याचा प्रवास बाराव्या वर्षीच झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.
या गडावर चंदनेश्वराचं पुरातन मंदिर आहे. शीलाहार काळातलं दुर्मिळ पंचलिंग आहे. इतकंच नाही, तर पीरशाह यांचा दर्गा आहे. पण या गडाची निर्मिती मात्र 800 वर्ष जुनी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement