Sanjay Raut : चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका, गृहमंत्री आहात याचे भान ठेवा; संजय राऊत यांचा फडणवीसांवर पलटवार
Sanjay Raut : सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संजय राऊत यांचे हे आरोप फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. फडणवीस यांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा असे संजय राऊत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसयांना पत्र लिहून आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे ( shriknat shinde ) यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबतचे एक पत्र संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या आरोपावर उत्तर देताना त्यांना फक्त सनसनाटी निर्माण करायची असल्याचे म्हटले. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणं अतिशय चुकीचं आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणं हे त्याही पेक्षा चुकीचं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. संजय राऊत असो की कोणीही असो, असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता आहे का, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का? ही सर्व कार्यवाही गुप्तचर विभाग करत असल्याचे त्यांनी म्हटले. राऊत आता बिनडोक आरोप करत असून त्याला काय उत्तर द्यायचे असा प्रश्न पडत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
संजय राऊत यांचा पलटवार...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नसल्याचे त्यांनी म्हटले. सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठान मध्ये मिळत असेल.बाळासाहेब ठाकरे स्कूल मध्ये नाही, असेही राऊतांनी म्हटले. सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? असा सवाल करताना चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा असेही राऊत यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
