एक्स्प्लोर

Sanjay Raut : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेत राहणार होते, राहिले का? एकनाथ शिंदेंच्या शपथेवरुन राऊतांचा बोचरा वार

Sanjay Raut On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या शपथेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई : दसरा मेळाव्यात  (Dasara Melava) झालेल्या भाषणानंतर आता त्यावरून शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde) आणि ठाकरे गटात (Shiv Sena UBT) आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आझाद मैदानावरील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची शपथ घेऊन मराठा आरक्षण (Maratha Reservation) देणार असल्याची घोषणा केली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शिवसेनेत राहणार होते, पण राहिलेत का? असा खडा सवालच राऊत यांनी केला आहे.  

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.  एकनाथ शिंदे यांचे भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी होते. भाजपच्या संपर्कात आल्याने खोट्या शपथांचे प्रमाण वाढले असल्याचा टोला त्यांनी लगावला. शपथा कसल्या घेता, बाळासाहेबांशी गद्दारी करता..महाराजांच्या महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसता आणि शपत काय घेता असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःचा आचार विचार नाही. जे भाजप सांगत आहे ते करत आहे. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते ते आता शिवसेनेत राहिले का असा बोचरा सवाल त्यांनी केला.  भारतीय जनता पक्ष आमचा छळ करते त्यामुळे जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसणारे हे आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

पालघर हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बदनामीचा कट

महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर हत्याकांड झाले नाही का, असा प्रश्न राऊत यांनी केला. पालघरचे हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीचा कट होता, असा दावाही त्यांनी केला. अशा प्रकारचं घडलेलं अपघाताचे प्रकरण वाढवण्यात आलं. त्यानंतर अनेक साधूंवरहल्ले झाले. हत्याकांड झाले, त्यावर तुमची का दातखिळी बसली असेही राऊत यांनी म्हटले. 

...म्हणूनच आमचा जळफळाट

महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे . महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्याची बदनामी केली जात आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे जळफळाट होत असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

शिमगा हा हिंदू सण नाही का?

शिमगा हा हिंदू सण नाही का? असा उलट प्रश्न राऊत यांनी केला. शिंदे गटाकडून ठाकरे गटाचा मेळावा नसून शिमगा मेळावा असल्याची टीका केली होती. त्यावर राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. उत्सवाचा मोठा भाग आहे. तुम्हाला नको आहे का? होळी, दिवाळी नवीन सण संघ परिवाराने आणले आहेत आणि ते तुम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहेत का असेही राऊत म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget