L K Advani: भाजपने लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती करायला हवं: संजय राऊत
राजीनामा देणं हे भुजबळांचं नाटक आहे.राजीनामा स्विकारण्याचा अधिकार शिंदेना आहे की फडणवीसांना आहे हे स्पष्ट करायला हवं, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal Krishna Advani) देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. भाजप वाढवण्यात अडवाणींचा मोठा वाटा आहे.पंतप्रधान पदाची योग्यता असातना त्यांना दूर सारण्यात आलं. भाजपने अडवाणींना राष्ट्रपती तरी करायला हवं होतं, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच छगन भुजबळांचा राजीनामा हे नाटक आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, लालकृष्ण अडवाणींचं योगदान मोठं आहे. अडवाणींनी राम रथयात्रा सुरु केली नसती तर आजचा भाजप दिसला नसता. अडणवाणींन वाजपेयी यांची पाठराखण केली. पंतप्रधान पदाची योग्यता असताना त्यांना दूर सारण्यात आलं. अडवाणींना राष्ट्रपती तरी करायला हवं होतं. पंतप्रधान होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर केले. त्यांना इतका अडगळीत टाकले की अडवाणींना विसरून गेले.आज त्यांचा वय 97 वर्ष आहे. त्यांना राष्ट्रपती पदाचा तरी सन्मान द्यायला हवा असं कायम म्हणणं आहे. आता भारतरत्न दिला आहे, आम्हाला आनंद आहे आम्ही स्वागत करतो.
फुसक्या धमक्यांना घाबरणारी ही बोगस शिवसेना नाही : संजय राऊत
सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरेंची सभा आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपाचा विरोध असून उध्दव ठाकरेंची सभा उधळून लावू , असा इशारा निलेश राणेंनी दिला. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, अशा धमक्या कोणी देत असेल आणि फुसके बार सोडत असेल तर ही बोगस शिवसेना नाही. उद्धव ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहे. कोकणची जनता त्यांची प्रतिक्षा करते आहे. या धमक्यांकडे दुर्लक्ष करावं . दौरा नियोजिन आणि ठरल्याप्रमाणे होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी प्रत्येक ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी कोकणवासीयांनी केली आहे. लवकरच ठाकरे राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात दौरा करतील.
भुजबळांचा राजीनामा स्विकारण्याचा अधिकार शिंदेंना की फडणवीसांना? राऊतांचा टोला
16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो असा मोठा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राजीनामा देणं हे भुजबळांचं नाटक आहे. राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेटच्या बैठकीत सामील झाले . कोणाच्या ताटातील काढून कुणाला देऊ नये. शिवसेनेची भुमिका स्पष्ट आहे भुजबळांनीही तीच भुमिका मांडली. त्यासाठी महाराष्ट्र टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. राजीनामा स्विकारण्याचा अधिकार शिंदेना आहे की फडणवीसांना आहे हे स्पष्ट करायला हवं.
मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानातून गुंडाना खतपाणी घालण्याचे काम : संजय राऊत
उल्हासनगर गोळीबार प्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानातून गुंडाना खतपाणी घालण्याचे काम सुरु आहे. गुंडांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानातून पोलिसांना फोन केले जातात.
हे ही वाचा :