एक्स्प्लोर

Shiv Sena MLA Disqualification : व्हीपवर स्वाक्षरी कोणी केली? ठाकरे गटाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याची उलट तपासणी

MLA Disqualification : शिवसेना ठाकरे गटाचे विधीमंडळ कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची आमदार अपात्रता प्रकरणात उलट तपासणी करण्यात आली.

Shiv Sena MLA Disqualification Hearing :  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत (Shiv Sena MLA Disqualification) आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी संपल्यानंतर शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयीन सचिव विजय जोशी (Vijay Joshi) यांची उलट तपासणी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून जोशी यांच्यावर व्हीप ड्राफ्ट, व्हीप कोणी दिला यासारखे प्रश्न केले. विजय जोशींकडून या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. 

सभागृहातील सुनावणीत काय घडलं?


जेठमलानी - तुम्ही केव्हापासून शिवसेना विधिमंडळ कार्यालयात कार्यरत आहात

विजय जोशी - 12 वर्षांपासून

जेठमलानी - तुम्ही कॉम्प्युटर सायन्स संदर्भात शिक्षण घेतले आहे का? 

विजय जोशी - सरकारी नोकरीसाठी आवश्यक संगणक परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. शिवसेना विधीमंडळ कार्यालयात रुजू होण्याआधी ही परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. मी विधीमंडळात काम केले आहे, सह सचिव म्हणून मी निवृत्त झालो. माझ्या निवृत्तीनंतर मी शिवसेना पक्ष कार्यालयात काम करू लागलो. 

जेठमलानी - या ठिकाणी तुमच्या कामाचा प्रकार काय होता? 

विजय जोशी - शिवसेनेच्या आमदारांना विधीमंडळ कामकाजात जी मदत लागत होती, ती करत होतो. त्यात लक्षवेधी, सूचना, प्रश्नोत्तरे याबाबत ड्राफ्टिंग मी करत होतो. कार्यालयात 7 कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून कामे करून घेणे, ही मुख्यत्वे माझी जबाबदारी होती.

जेठमलानी - कोणत्या पदावर तुम्ही का करण्यास सुरुवात केली? 

विजय जोशी - कार्यालय सचिव

जेठमलानी - तुमची शैक्षणिक पात्रता काय? 

विजय जोशी - बीएससी एलएलबी

जेठमलानी - पक्षाचा व्हीप ड्राफ्टिंग करण्याचे तुमचे काम होते का? 

जोशी - होय

जेठमलानी - तुम्ही तुमच्या कार्यकाळात किती व्हीप ड्राफ्टिंग केले आहेत? 

जोशी - अधिवेशन काळात दोन ते तीन व्हीप मी ड्राफ्टिंग केले आहेत. साधारणतः सुनील प्रभू हे मला विषय सांगायचे. मी व्हीप ड्राफ्टिंग करायचो आणि नंतर सुनील प्रभू यांची परवानगी घ्यायचो. तसेच त्यांनी सही केल्यानंतर मी आमच्या कॉम्प्युटर ऑपरेटरला व्हीप पाठवण्यास सांगत होतो.

जेठमलानी - 2022 पासून संगणक वापरणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे? ज्यांना तुम्ही सूचना देत होता. 

जोशी - आमच्या कार्यालयात 3 संगणक ऑपरेटर आहेत. प्रत्येक वेळी एकच संगणक ऑपरेटरकडे हे काम दिले जात नाही.

जोशी - त्यांची नावे पाहिजेत का? 

जेठमलानी - होय

जोशी - अर्चना खंडीझोड, गीता सावंत, रवि गंगवार

जेठमलानी - तुम्ही हे व्हीप ड्राफ्ट केले आहेत का? 

जोशी - होय. 

जेठमलानी - प्रभु यांच्या आदेशाने केले आहेत का? 

जोशी - होय

जेठमलानी - या व्हीप वर प्रभु यांची स्वाक्षरी आहे का? 

जोशी - होय

जेठमलानी - प्रभु यांची स्वाक्षरी कुठल्या कागदपत्रांवर घेत होता? 

जोशी - मला प्रश्न समजला नाही. 

जेठमलानी - म्हणजे प्रभु यांची स्वाक्षरी पत्रावर घ्यायचा की प्रिंट आऊट वर घेत होता? 

जोशी - प्रिंट आऊट

जेठमलानी - प्रिंट आऊट कोण घेत होते? 

जोशी - आमचे ऑपरेटर प्रिंट आऊट काढायचे

जेठमलानी -  2 जुलैचा व्हीप कुणी टाइप केला?

जोशी -  नक्की कुंठल्या कॉम्प्युटर ऑपरेटरने टाइप केला हे मला आठवत नाही

जेठमलानी -  ते व्हीप कोणी वाटले

जोशी - ऑफिसमधल्या शिपायाने

जेठमलानी - त्यांची नावे काय

जोशी-  माझ्या ऑफिसमध्ये दोन शिपाई आहेत..गुरुदास राणे आणि संजय राणे

जेठमलानी-  दोघांपैकी कुणी व्हीप वाटला

जोशी -  गुरुदास राणे हे संजय राणे यांच्या मदतीने व्हीप वाटायचे काम करतात.. विशिष्ठ सदस्यांना विशिष्ठ शिपायांनी हे व्हीप द्यावे असे नाही..

जेठमलानी -  ज्या आमदाराना व्हीप दिला जातो त्या आमदारांची सही घेणे त्या शिपायांचे काम आहे का? 

जोशी - ऑफिसमध्ये आमदारांच्या याद्या आहेत. त्या यादीमध्ये सदस्याच्या नावासमोर सही घेतली जाते. व त्या यादीच्या वर व्हीपचा क्रमांक आणि तारीख लिहिली जाते.. आणि व्हीपच्यावर दोन चार कॉपी ठेवल्या जातात


जेठमलानी - तुम्ही तुमच्या प्रतिज्ञा पत्रात जो दोन व्हीप पाठवल्याचा मुद्दा नमूद केला तो खोटा आहे

जोशी -  तुम्ही जे बोलता ते खरे नाही

जेठमलानी -  सुनील प्रभू यांच्या सोबत 29 नोव्हेंबर 2023 रोजी मिटिंग झाली त्याचा आग्रह तुम्हाला कुणी केला..ती कुणाच्या सांगण्यावरून झाली

जोशी -  सुनील प्रभू यांनी मला भेटायला सांगितले मी त्यांना भेटलो

जेठमलानी - या भेटी दरम्यान आणखी कोण कोण होते

जोशी -  मला आता आठवत नाही

जेठमलानी -  अनिल देसाई हे बैठकीत हजर होते का? 

जोशी - हे मला आठवत नाही

जेठमलानी - सुनील प्रभू यांनी तुम्हाला प्रत ईमेल करायला सांगितली, पण व्हॉट्स अप करू नका म्हणून सांगितले. हे खरे आहे का? 

जोशी - होय. 

जेठमलानी - कॉम्प्युटर ऑपरेटरकडे तुम्ही गेला. त्यावेळी कम्प्युटर ऑपरेटर कुठे होता? 

जोशी - कॉम्प्युटर ऑपरेटर त्याच्या जागेवर होता. विधीमंडळाच्या चौथ्या मजल्यावर रुम नंबर 4 ए मध्ये बसला होता. 

जेठमलानी - हा तोच कॉम्प्युटर ऑपरेटर आहे, जो नेहमी कॉम्प्युटर ऑपरेट करतो. 

जोशी - हो खरे आहे. 

जेठमलानी - त्या कॉम्प्युटर ऑपरेटरचे नाव तुम्ही सांगाल का? 

जोशी - मला त्याचे नाव आठवत नाही. कारण माझ्या कार्यालयात तीन कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत. 

जेठमलानी - तुम्ही 3 कॉम्प्युटर ऑपरेटरची नावे सांगितले आहेत. हे तिघेही 4 ए रुममध्ये बसतात का? 

जोशी - हो

जेठमलानी - याच ठिकाणी सर्व व्हीप टाईप करून झाल्यावर प्रिंट आऊट काढल्या जातात का? 

जोशी - होय, याच रुममध्ये काढल्या जातात. 

जेठमलानी - तुम्ही याच रुममध्ये सहसा त्यास प्रिंट आऊट काढायला सांगत असाल. तेव्हा किती वेळेत ते प्रिंट आऊट काढून देतात? 

जोशी - 15 ते 30 मिनिटांत दिली. 

जेठमलानी - 29 नोव्हेंबर रोजी तुम्हाला त्याने किंवा तिने प्रिंट आऊट काढून दिली. 

जोशी - मला नक्की आठवत नाही, त्याने नेमका किती वेळ घेतला. 

जेठमलानी - प्रिंट आऊट घेत असताना सुनील प्रभू तुमच्या सोबत होते का? 

जोशी - नाही.

जेठमलानी - ऑपरेटरने तुम्हाला प्रिंट आऊट दिली, त्यानंतर तुम्ही प्रभू यांच्या हातात वैयक्तिक ही प्रिंट आऊट दिली का? 
(दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना आठवण्यासाठी त्यांना एवढा वेळ लागू नये. मी सुद्धा 67 वर्षांचा आहे.) 

जोशी - मी स्वतः दिलेला नाही. माझ्या ऑफिसमधील मनोज चौगुले यांना दिला. त्यांनी तो सुनील प्रभू यांना दाखवला. 

जेठमलानी - कॉम्प्युटर ऑपरेटरने 29  नोव्हेंबर 2023  रोजी किती प्रिंट आऊट तुम्हाला काढून दिल्या? 

जोशी -  एक प्रिंट आऊट दिली


जेठमलानी - तुम्ही दोन प्रिंट आऊट काढल्या की तोच प्रिंट आऊट अनिल देसाई यांना दिला आणि तोच सुनिल प्रभु यांना दिला? 

जोशी - प्रिंट आऊट फक्त सुनील प्रभू यांना दाखवण्यासाठी मनोज चौगुले यांच्याकडे दिला होता. त्यानंतर 4 ते 5 वाजता अनिल देसाई आले होते, त्यांच्याकडे तोच प्रिंट आऊट दिला.

जेठमलानी - एखादा ईमेल दाखवून तुम्ही सांगू शकता का की नेमका कोणत्या कॉम्प्युटर ऑपरेटर ने हा ई-मेल पाठविला आहे किंवा प्रिंट आउट आहे?

विजय जोशी -हो सांगू शकतो

(जोशी यांना प्रिंट आऊटची कॉपी दाखवण्यात येत आहे.)

 विजय जोशी यांची उलट तपासणी संपली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
Embed widget