MLA Disqualification Case : 318 प्रश्न, टोकदार प्रश्नांना जशासं तशी उत्तरं, सुनील प्रभूंची उलट तपासणी संपली, जाता जाता शिंदेंचे वकील म्हणाले....
MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने 22 जून 2022 ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा अर्ज शिंदे गटाने केला आहे.
MLA Disqualification Case Latest Update : शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification) ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष अखेर संपली. तब्बल 318 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर उलट साक्ष संपली. आता दुसऱ्या सत्रात विजय जोशी उलट साक्ष देणार आहेत. शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी हेच विजय जोशी यांची उलट साक्ष घेणार आहेत. आज शिंदे गटास उलट साक्ष घेण्याचा अखेरचा दिवस आहे.
शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification) आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी झाली. शिंदे गटाने (Shinde Group) दाखल केलेल्या अर्जावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Devadatt Kamat) उत्तर देत आहेत. परिच्छेद 18 मध्ये बनावट ईमेल प्रकरणी माहिती दिली आहे. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने 22 जून 2022 रोजी ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ज्या व्यक्तीच्या नावे हा अर्ज दाखल केला आहे, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे धाडस दाखवलं नाही. देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता टोला लगावला आहे. फक्त वकिलांमार्फत ड्राफ्टिंग करण्याचे काम या अर्जात दिसतंय, असं देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने 22 जून 2022 ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा अर्ज शिंदे गटाने केला आहे. त्यावर देवदत्त कामत उत्तर देत आहेत. शिंदे गटाने जानेवारीत दाखवलेल्या नोंदवहीतील ई मेल आयडीवरच मेल पाठवल्याचं देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे. ज्यांच्या नावे हा अर्ज केला गेला, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं धाडस दाखवलं नाही, असा टोला कामत यांनी शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.
शिंदे गटाकडून जानेवारी महिन्यातील नोंद वही दाखवण्यात येत आहे. त्यांच्याकडून मे महिन्यात प्रकाशित झालेली नोंद वही दाखवण्यात आली नाही. पहिल्याच पानावर एकनाथ शिंदे यांचा तोच ईमेल आयडी दिला आहे, जो आम्ही सादर केला आहे
विधानसभा अध्यक्षांसमोर सुनील प्रभू यांची उलट तपासणी
देवदत्त कामत : शिंदे गटाकडून जानेवारी महिन्यातील नोंद वही दाखवण्यात येत आहे. त्यांच्याकडून मे महिन्यात प्रकाशित झालेली नोंद वही दाखवण्यात आली नाही. पहिल्याच पानावर एकनाथ शिंदे यांचा तोच ईमेल आयडी दिला आहे, जो आम्ही सादर केला आहे. ही कुठली बनवाबनवी आहे. हा सरळ सरळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे
महेश जेठमलानी : आम्ही ठाम आहेत. हा मेल आयडी बनावट आहे. माझा मुद्द्यावर अध्यक्ष निर्णय घेतील.
महेश जेठमलानी : : मी सांगू इच्छितो की आपल्या प्रतिज्ञापत्रानुसार २५ जून २०२२ रोजी कुठलीही राष्ट्रीय कार्यकारीणी किंवा प्रतिनिधी सभा झाली नाही. तसेच कुठलाही ठराव त्यात संमत झाला नाही.
सुरेश प्रभू - हे खोटे आहे.
महेश जेठमलानी : या बैठकीची कोणतीही नोटीस प्रतिवाद्यांना देण्यात आलेली नव्हती
प्रभू - मला आठवत नाही
जेठमलानी - शिवसेनेनेमध्ये पक्ष प्रमुख या नावाचे पद अस्तित्वात नाही.
प्रभू - ऑन रेकॉर्ड आहे
जेठमलानी - एक्झिबिट पी १२ए मधील आर्टिकल १४ नुसार शिवसेना पक्ष प्रमुख हे पद नाही. किंवा या पदावरील व्यक्तीचे निर्णय बंधनकारक नाहीत.
प्रभू - ऑन रेकॉर्ड आहे
जेठमलानी - शिवसेना राजकीय पक्षात राष्ट्रीय कार्यकारीणी ही निर्णय घेणारी मुख्य संस्था आहे. आपण म्हटल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे पद नव्हे.
प्रभू - हे खोटे आहे.
जेठमलानी - आपण संघटनात्मक केलेले बदल हे तरतुदींविरोधात आहेत. तसेच पक्षाच्या लोकशाही तत्वांविरोधात आहेत. निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुकांसदर्भात केलेले बदल हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अंगिकारले होते.
प्रभू - हे खरे नाही.
जेठमलानी - प्रभू तुम्ही २४ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे व १५ आमदार यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केलेली आहे
मग उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली?
प्रभू - ऑन रेकॉर्ड आहे..पण आता मला आठवत नाही
विधानसभा अध्यक्ष - आपल्याला प्रश्न समजला ना, आपण अपात्रता याचिका २४ जूनला दाखल केली. मग उद्धव ठाकरे यांनी ३० जूनपर्यंत शिंदे यांना पदावरून हटवण्यासाठी वाट का पाहिली?
प्रभू - मला आता आठवत नाही.
(अध्यक्षांकडुन नोंद घेतली जात आहे. साक्षीदाराने वकिलांना प्रश्नाचे उत्तर दिले नाही. उत्तर आठवत नाही, असे साक्षीदाराकडून सांगण्यात आले.)
जेठमलानी - पूर्वीच्या घटनेनधील तरतुदीनुसार उद्धव ठाकरे यांना मनमानी व घटना विरोधी तरतुदी करत्या आल्या नसत्या.
प्रभू - हे खोटे आहे
जेठमलानी - २०१८ हे पहिल्यांदा तेव्हा प्रकाशात आले, जेव्हा २०२२ मध्ये अपात्रता कार्यवाही सुरु झाली. तसेच निवडणूक आयोगाच्या रेकॉर्ड वर हे बदल नाही आहेत.
प्रभू - हे खोटे आहे
जेठमलानी - अनिल देसाई हे ३० जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांच्या तर्फे एकनाथ शिंदे व इतर आमदारांना पदावरून हटवण्यात येत आहे, हे १ जुलै २०२२ निवडणूक आयोगाला कळवले.
प्रभू - हे खोटे आहे
जेठमलानी - उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व इतर आमदारांना पक्षातील पदावरून पक्षाविरुद्ध कारवाई करत असल्याचे सांगत काढत असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले, हे आपण जो पक्षादेश काढला आहे त्यानुसार शक्य नाही.
प्रभू - हे खरे नाही
सुनावणी दरम्यान पुन्हा टीका टिप्पणी
जेठमलानी यांचा सवाल - अनिल देसाई आज आले आहेत का? त्यावेळी मागच्या बाकावरून मागे आहेत असे उत्तर आले
अनिल देसाई - हो मी आलोय, मी आल्याने तुम्ही नाराज (अपसेट) झालात का? असे अनिल देसाई म्हणालेत
जेठमलानी - उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांचे प्रश्नात नाव घेतले की प्रभू डायरेक्ट बोलतात की हे खरे नाही ते वफादार आहेत
*अध्यक्ष - हे खरे नाही याचा अर्थ दुसराही ही होतो
जेठमलानी - आपण शिवसेना आमदारांना ४ जुलै २०२२ रोजी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकार विरोधात मतदान करण्याचा व्हीप का काढला?
प्रभू - ज्या आमदारांना व्हीप बजावला होता, त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केले होते. महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती, त्यामुळे तो विश्वासदर्शक ठराव होता. महाविकास आघाडीला विश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे ही भूमिका होती. म्हणून पूर्ण वेळ उपस्थित राहून भाजपने जो विश्वासदर्शक ठराव मांडला होता, त्याविरुद्ध महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्यासाठी मी व्हीप काढला होता.
सुनील प्रभू यांकडून उत्तरात पुन्हा बदल करण्याची विनंती
अध्यक्षांकडून उत्तरात बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे
सुधारित उत्तर -
प्रभू - सर्वच आमदारांना व्हीप बजावला होता. काही आमदार पक्ष विरोधी मतदान करणार होते, असे समजले. विश्वास दर्शक ठराव भारतीय जनता पक्षाने मांडला होता. या ठरावाला महा विकास आघाडीने विरोध दर्शवला होता. शिवसेना महा विकास आघाडी सोबत होती. म्हणून विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करावे, व महा विकास आघाडीच्या बाजुने मतदान करावे म्हणून हा व्हीप काढण्यात आला होता.
सुनील प्रभू- त्यांच्या वकिलांच्या बाजूला बसून मी सगळं लिहिलं आहे,
अध्यक्ष (मिश्किलपणे ) - त्यांच्या वकिलांनी तुम्हाला काय सांगितले नाही ना
जेठमलानी - प्रत्येक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला शिवसेनेने व्हिप काढला नव्हता
प्रभू - काही वेळा बिनविरोध झाली असेल म्हणून नसेल काढला
जेठमलानी - ज्या प्रकरणात अध्यक्ष पदाच्या निवडणूक झाल्या, बिनविरोध निवडणूक झाल्या नाहीत, अशावेळी ही शिवसेनेने व्हीप काढला नाही.
प्रभू - हे खोटे आहे
जेठमलानी - ३ जुलै २०२२ रोजीच्या अधिवेशनात आपण उपस्थित होतात का?
प्रभू - आता मला नेमके आठवत नाही. ३ जुलैचे. मला बघावे लागेल.
जेठमलानी - अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी विश्वास दर्शक ठराव मांडला. त्यावेळी आपण हजर होतात का ?
प्रभू - मी हजर होतो आॅन रेकाॅर्ड आहे
जेठमलानी - मग तुम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले का ?
प्रभू - हो मी त्या विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केलं
जेठमलानी - मतदारांना सादर करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व युतीच्या विरोधात आपण मतदान करून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे का?
प्रभू -हे खोटे आहे साहेब.
जेठमलानी - २०२२ रोजी अपात्रता याचिकेतील ठरावाची प्रत आपल्याला कशी व केव्हा मिळाली?
प्रभू - आता आठवत नाही अध्यक्ष महाराज
जेठमलानी -आपण २१ जून २०२२ रोजी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली होती का?
प्रभू - आता आठवत नाही.
जेठमलानी - शिवसेना पक्षाच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का?
प्रभू - हो नक्की आहे.
जेठमलानी - बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट नावाने ओळखले जाते, हे तुम्हांला माहिती आहे का?
प्रभु -हे सर्व जगाला माहिती आहे.
जेठमलानी -तुमच्या माहितीनुसार, शिवसेना राजकीय पक्ष किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ घेण्याचा निर्णय घेतला होता का?
प्रभु -हे धादांत खोटे आहे.
प्रभु -शिवसेना कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही. (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जेठमलानी यांचे प्रत्युत्तर मी पूर्ण सहमत आहे
जेठमलानी- उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राजकिय पक्ष नसून राजकिय नेत्यांचा समूह आहे
प्रभू - हे खरं नाही
जेठमलानी
हा पक्ष कधी स्थापन केला
सुनील प्रभू
मला माहीत नाही, म्हणजे मला आठवत नाही.
जेठमलानी - आपण पूर्वी दिलेल्या उत्तरात काय खोटे आहे?
१) उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली?
२) काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका केली नाही?
३) हे दोन्ही
प्रभू - प्रश्न खूप कठीण आहे, मला उत्तर देता येणार नाही.
जेठमलानी
या तीनपैकी कुठली गोष्ट सत्य आहे?
१) उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली?
२) काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा विरोध केला व निषेध केला?
३) हे दोन्ही असत्य आहे
प्रभु -
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी नाही तर युती केली, हे सत्य आहे.
जेठमलानी
मग असत्य काय आहे?
प्रभु -
मला आठवत नाही.
जेठमलानी (ऑफ रेकॉर्ड)
युती केलेल्या पक्षाची खूप भीती आहे
सुनील प्रभू यांची उलट साक्ष अखेर संपली
तब्बल ३१८ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर उलट साक्ष संपली
आता दुसऱ्या सत्रात विजय जोशी देणार उलट साक्ष
शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी घेणार उलट साक्ष
आज शिंदे गटास उलट साक्ष घेण्याचा अखेरचा दिवस