एक्स्प्लोर

दिवा विझताना मोठा होतो ; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर  

"दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसले. जय महाराष्ट्र." असे उत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) टीकेला दिले आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत  यांच्यावरही टीका केली. राज ठाकरे यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे. "दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसले. जय महाराष्ट्र." असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. 

संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याचा उल्लेख करत आज राज ठाकरे म्हणाले, "हा विझणारा पक्ष नाही तर विझवणारा पक्ष आहे." 

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. "संजय राऊत हे राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे हेच कळत नाही. यांची संपत्ती जप्त केली तर हे पत्रकार परिषदेतून शिव्या देत आहेत. परंतु, हे पत्रकार परिषदेत बोलताना कोणती भाषा वापरतात हे यांना तरी समजते का?  असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही नक्कल केली होती. नागानं फणा काढावा, असा त्यांचा चेहरा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.  त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. 

 "माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हो माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. परंतु, जो मस्ती करेल त्याच्यासमोर फणा काढला जाईल. स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत, त्या जागा राज ठाकरे यांनी  घ्याव्यात, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget