धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांनी त्यांच्या बंदुकीतून दोन राउंड गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
वाराणसी : शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय (Shiv Sena Shinde faction corporator Kamlesh Rai ) यांनी त्यांच्या बंदुकीतून दोन राउंड गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाराणसी विमानतळावर ही घटना घडली. कमलेश राय आणि त्यांची पत्नी वाराणसी विमानतळामधून मुंबईसाठी निघाले होते. यावेळी वाराणसी विमानतळावर परवानाधारक बंदुकीतून त्यांनी गोळीबार केला. पिस्तुल तपासणीदरम्यान माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडून गोळी सुटल्याची माहिती मिळत आहे.
बंदूक लॉक करत असताना दोन राउंड फायरिंग झाल्याची माहिती
वाराणसी एअरपोर्ट मध्ये बंदूक लॉक करत असताना माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या बंदुकीतून दोन राउंड फायरिंग झाले आहेत. वाराणसी एअरपोर्ट परिसरात गोळीबार झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाने कमलेश रायला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. दरम्यान, विमानतळावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. काही काळा प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तातडीन कमलेश रायला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पिस्तुलासोबत 21 जिवंत काडतुसे असल्याची माहिती
प्रवासी कमलेश केदारनाथ राय यांच्याकडे 7.62 मिमी पिस्तुल होते. पिस्तुलासोबत 21 जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 1810 विमानाने ते मुंबईला जाणार होते. सकाळी सुमारे साडेनऊ वाजता शस्त्र तपासणीदरम्यान बंदुकीतून गोळ्या सुटल्याची घडली घटना आहे. गोळी रिकोशेट होऊन दोन सुरक्षा तपासणी कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. यामध्ये रोहित राज आणि सुमन कुमारी यांना दुखापत झाली आहे.
शिवसेनेचा माजी नगरसेवक कमलेश रायला पोलिसांनी घेतलं ताब्यात, चौकशी सुरु
दोन्ही जखमींना तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. स्थानिक पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती देखील देण्यात आली. यानंतर शिवसेनेचा माजी नगरसेवक कमलेश रायला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी त्याची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. या घटनेची BCAS कडून सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
चौकशीच्या निष्कर्षानंतर योग्य कारवाई केली जाणार
शस्त्र हाताळणीच्या निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन झाले का? याची तपासणी देखील करण्यात येणार आहे. चौकशीच्या निष्कर्षानंतर योग्य कारवाई केली जाणार आहे. घटना नियंत्रणात असून विमानतळाचे कामकाज सुरळीत सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.





















