Aditya Thackeray : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, मग पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक का घेत नाही? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगालाच सवाल
Election : पुणे आणि चंद्रपूर लोकसभेच्या जागा रिक्त होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, तरीही या ठिकाणी निवडणुका का घेतल्या जात नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

मुंबई: मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या संबंधित निवडणूक आयोगाने आजच घोषणा केली. पण त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रश्न विचारला आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणुका (Five States Assembly Election Dates) जाहीर केल्या गेल्या, पण चंद्रपूर आणि पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर करण्यात आली नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. या दोन्ही जागा सहा महिन्यांहून जास्त काळ रिक्त असल्या तरी निवडणूक आयोगाने निवडणुका का घेतल्या नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray says, "Assembly elections of five states were announced today but no announcements have been made by EC on the Lok Sabha by-polls of Pune and Chandrapur, I want to know why" pic.twitter.com/B2nGpORbpI
— ANI (@ANI) October 9, 2023
पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम खालीलप्रमाणे,
मिझोरम- 7 नोव्हेंबर
छत्तीसगड-7, 17 नोव्हेंबर
मध्यप्रदेश- 17 नोव्हेंबर
राजस्थान -23 नोव्हेंबर
तेलंगणा- 30 नोव्हेंबर
5 States to go for Assembly Polls!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 9, 2023
The people will vote for peace, prosperity and progress assured by the INDIA alliance.
India, that is Bharat will not vote for those who create rifts, and aim to change the constitution and damage our democracy and country.
ही बातमी वाचा:























