एक्स्प्लोर
डॉ. आंबेडकर, महात्मा गांधींपेक्षा सावरकर श्रेष्ठ असं म्हणालोच नाही : शरद पोंक्षे
काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अभिनेते शरद पोंक्षे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर पोंक्षे यांनी सोलापुरात स्पष्टीकरण दिलंय.
सोलापूर : अस्पृश्यता निवारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य मी कधीच केलं नाही. पण ज्यांना ब्रेकिंग न्यूज द्यायच्या आहेत ते जाणीवपूर्वक आपल्या आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष वाढेल, अशा पद्धतीने बातम्या देतात. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लोक मला दुसरी बाजू न विचारताच त्यावर प्रतिक्रिया देतात हे अधिक क्लेशकारक आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते हे शरद पोंक्षे यांनी केलंय.
हरी नरके यांनी किमान मला एकदा फोन करून विचारायला हवं होतं किंवा उपस्थित असलेल्या दोन हजार प्रेक्षकांना तरी विचारलं पाहिजे होतं, असेही वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अभिनेते शरद पोंक्षे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पोंक्षे यांनी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दाखवलं होतं. त्यावरून त्यांनी आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलं. दरम्यान मी नथुराम गोडसे हे नाटक केलं असलं तरी मला महात्मा गांधींबद्दल आदर आहे. हा आदर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिसुद्धा असून सावरकरांच्या बद्दलही आहे. ही महान माणसं आहेत. त्यांच्यावर टीका करणारा मी कोण? असा सवाल देखील शरद पोंक्षे यांनी यावेळी उपस्थित केला.
गांधीपेक्षा सावरकर श्रेष्ठ असं म्हणालोच नव्हतो : शरद पोंक्षे
जे मी बोललो नाही ते छापलं : पोंक्षे
शाहू, फुले, आंबेडकर यांच्यापेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे, असं मी कधी बोललोच नाही. माझं संपूर्ण भाषण काढून ऐका. मात्र, आपल्याकडे विचित्र पत्रकारिता सुरू झाली आहे. कोणतेही वाक्य कुठेही जोडून बातमी करायची पद्धत सुरू झालीय, अशी खंत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. हरी नरके यांनी किमान मला एकदा फोन करून विचारायला हवं होतं किंवा उपस्थित असलेल्या दोन हजार प्रेक्षकांना तरी विचारलं पाहिजे होतं, असंही ते म्हणाले. फर्ग्युसन महाविद्यालयात अनेक प्राध्यापक, विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनाही विचारले असते तरी खरी माहिती समोर आली असती. मी स्वतः सर्व महापुरुषांचा आदर करतो. या सर्व लोकांची कामे चांगली आहेत. मी त्यांच्यासमोर किड्यामुंगी असल्यासारखा असल्याचेही पोंक्षे यावेळी म्हणाले.
'Mi Savarkar' event at Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात पुरोगामी विद्यार्थ्यांचा गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement