एक्स्प्लोर

गांधीपेक्षा सावरकर श्रेष्ठ असं म्हणालोच नव्हतो : शरद पोंक्षे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

मुंबई : 'दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे', असे म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान महात्मा गांधीपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर श्रेष्ठ असं विधान आपण केलं नाही, तर माध्यमांनी याचा विपर्यास केल्याचा दावा शरद पोंक्षे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या 'सावरकर विचार दर्शन' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दरम्यान महात्मा गांधींपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर श्रेष्ठ असं विधान आपण केलं नाही, माध्यमांनी याचा विपर्यास केल्याचा दावा शरद पोंक्षेनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा मतिमंद आहे, असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर टीका उडवली. मला राहुल गांधींचे आभार मानायचे आहेत. त्यांनी एक-दोन महिन्याने असे वक्तव्य करावेत. मी त्यांच्यावर चिडत नाही, उलट त्यांचे आभार मानायचे आहे. कारण त्या निमित्ताने आम्ही जागे होतो. sharad Ponkshe | गांधीपेक्षा सावरकर श्रेष्ठ असं म्हणालोच नव्हतो : शरद पोंक्षे | ABP Majha सावरकरांचे कार्य हे आंबेडकर-फुलेंच्या तोडीसतोड आहे. मात्र सावरकरांचा अपमान झाल्यावर एकही ब्राह्मण रस्त्यावर येत नाही. फक्त घरात सोफ्यावर बसून बोलतात अशी खंत पोंक्षे यांनी यावेळी व्यक्त केली. गांधीवाद हा समस्येवरील तात्पुरता उपाय तर सावरकरांचे विचार म्हणजे समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. हेच सांगताना अहिंसेचं लोण हे शिवाजी महाराजांच्या काळात नव्हतं हे एक बरं झालं. नाहीतर आज या महिला इतक्या रात्री इतक्या नसत्या,अशी टिपणी देखील त्यांनी या वेळी केली.

देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget