एक्स्प्लोर

Sharad Pawar : 'मोदी की गॅरंटी चालणार नाही, आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ', शिवाजी पार्कातून शरद पवार कडाडले

Sharad Pawar : देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलली पाहिजे. देशात मोदी की गॅरंटी चालणार नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.

Sharad Pawar Speech Shivaji Park Mumbai : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) आज शिवाजी पार्क येथे समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून (India Alliance) जाहीर सभा आयोजित करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीने या सभेतून फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

शरद पवार म्हणाले की, राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी आपण येथे आलोय. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी (Rahul Gandhi) देशातील लाखो लोकांना भेटले. आजच्या सभेला इतक्या मोठ्या संख्येने लोकं उपस्थित आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे देशात सध्या जी परिस्थिती आहे . यात बदल करण्याची गरज आहे. हा बदल आपण सर्व जण एकत्र येऊन आणू शकतो. 

कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही

ज्या सरकारने जनतेला वेगवेगळे आश्वासन देऊन फसवले. त्या सरकारला हटवण्यासाठी आपल्याला ज्या दिवशी मतदानाची संधी मिळेल, त्या दिवशी आपल्याला पाऊल उचलावे लागेल. आपण पाहतोय की ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी देशाला अनेक आश्वासने दिले. शेतकऱ्यांना, कामगारांना, तरुणांना, महिलांना, दलित आणि आदिवासी जनेतला अनेक आश्वासने दिली होती. मात्र कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही. 

दबाबतंत्राविरोधात आपल्याला लढलं पाहिजे

जे लोक आश्वासन देतात आणि पूर्ण करत नाहीत, त्यांच्याविरोधात आपल्याला एकत्र यायला हवे. गेल्या काही दिवसांपासून आपण टीव्हीवर एक गोष्ट ऐकतोय, मोदी की गॅरंटी. पण ही गॅरंटी चालणार नाही. या गॅरंटीत सिक्युरिटी नाही. त्यामुळे चुकीची गॅरंटी देत, चुकीचे आश्वासन देत त्यांनी भरकटवण्याचा प्रयत्न केला.  दबाबतंत्राविरोधात आपल्याला लढलं पाहिजे. 

आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ

आजपासून टीव्हीवर गॅरंटी येणार नाही. गॅरंटीला रोखण्याचे काम निवडणूक आयोगाने (Election Commission) केले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. याच मुंबईतून महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होते. पण आता भाजपला (BJP) चलो जाओ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे. 

आणखी वाचा 

भाजपवाले 'गोबर को भी हलवा कहते है', मोदीजी खोटेपणाचे डीलर, होलसेलर, तेजस्वी यादवांचा शिवाजी पार्कात हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget