भाजपवाले 'गोबर को भी हलवा कहते है', मोदीजी खोटेपणाचे डीलर, होलसेलर, तेजस्वी यादवांचा शिवाजी पार्कात हल्लाबोल
Shivaji Park, Mumbai : "भाजपवाले 'गोबर को भी हलवा कहते है', मोदीजी खोटेपणाचे डीलर, होलसेलर आहेत. मोदीजी खोट बोलण्याचा कारखाना आहेत.
Shivaji Park, Mumbai : "भाजपवाले 'गोबर को भी हलवा कहते है', मोदीजी खोटेपणाचे डीलर, होलसेलर आहेत. मोदीजी खोट बोलण्याचा कारखाना आहेत. आम्ही खरेपणाने सामोरे जाणारे लोक आहोत. यांना आम्ही घाबरणार नाहीत. आम्हाला तुम्ही साथ द्या", असं बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले. मुंबईतील शिवाजी पार्क येथे इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधींनी प्रेमाचं दुकान उघडलय
तेजस्वी यादव म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रेमाचं दुकान उघडलंय. त्यांची दुकान बंद पडू देऊ नका. भाजपवाल्यांनी देशात द्वेष पसरवला आहे. त्यामुळे आपल्याला लोकांमध्ये राहायचे आहे. कायम राहुल गांधी आणि आमचा झेंडा बुलंद करा. डॉक्टरांनी लालूजींना फिरण्यास मनाई केली आहे. आज इथे लालू आले नाहीत. मात्र, मोदींवर औषध तयार करण्यास आज देखील ते सज्ज आहेत. आम्ही खरे पणा असलेले लोक आहोत. त्यामुळे आम्ही भीत नाहीत. लढत राहणार आहोत.
ते लीडर नाहीत तर डिलर आहेत
पुढे बोलताना तेजस्वी म्हणाले, इथे ऑपरेशन लोटस सुरु होते. आज इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित आहेत. त्यांना माहिती आज जे इथल्या राज्य सरकारमधील नेते आहेत, ते लीडर नाहीत तर डिलर आहेत. आज मुंबईत भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस आहे. आम्ही राहुल गांधींचे आभार मानतो. त्यांनी देशातील प्रत्येक भागात यात्रा काढली. द्वेष पसरला जात असताना तुम्ही प्रेमाचे दुकान उघडले. हा यात्रेचा पहिला टप्पा आहे. मात्र, आम्ही कायम लोकांच्या मागे उभे राहणार आहोत. मोदी जी गॅरंटी देतील ते द्या पण पहिली आमच्या चाच्याची गॅरंटी द्या. बिहारमध्ये उपमुख्यमंत्री होतो त्या काळात पाच लाख नोकरी दिल्या. तुम्ही 10वर्षात तरी दिल्या का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला. शिवाय यावेळी त्यांनी भाजपा भगावो देश बचाओ, अशा घोषणाही दिल्या.
Tejashwi Yadav speech Mumbai : ठाकरेसाहब..... सर्वांना पाया पडून वंदन, तेजस्वी यादवांचे शिवाजी पार्कवर भाषण
#WATCH | Mumbai, Maharashtra: At Congress leader Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra, RJD leader Tejashwi Yadav says, "....He (Rahul Gandhi) has tried to deliver a message which is quite significant in today's days...To save India's Constitution, brotherhood and to defeat… pic.twitter.com/DVkfbrrQXc
— ANI (@ANI) March 17, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
Rahul Gandhi Live Updates : सोबत असो वा नसो आपण एकत्र लढलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन