एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sharad Pawar Speech : अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात? पवारांचा सवाल

Sharad Pawar Speech :  देशात भाजपला अनुकूल परिस्थिती नाही. अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरीदेखील भाजप सातत्याने 450 जागांवर विजयी होणार असल्याचा दावा कोणत्या आधारावर करत आहे, असा सवाल शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar Speech :  भाजपच्या (BJP) हातात सत्ता आहे. शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्यावतीने सुरू आहे. सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही, अथवा बळकट नाही. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. तरीदेखील 450 जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर सांगत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. 

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरू आहे. या शिबिरात समारोपात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. पवार यांनी म्हटले की, मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीने सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले.

आपल्या भाषणात पवार यांनी म्हटले की, सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आपण पहिलं तर भाजप त्या ठिकाणी भाजप नाही. काही राज्य असे आहेत जिथं भाजप आहे. मात्र, ते स्वत: च्या बळावर नाही. गोव्यात काँग्रेसच सरकार होत तिथं आमदार फोडण्यात आले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही असेही पवार यांनी म्हटले. 

भाजपने फसवणूक केल्याचे लोकांना समजू लागले आहे

आपल्या हातात सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केल्या. मात्र, त्या पूर्ण केल्या नाहीत केवळ फसवणूक केली,आता हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. एखाद्या धोरणाबाबत अशी मांडणी करतात की खासदार थक्क होऊन जातात असेही पवार यांनी म्हटले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले. मात्र, तसं झालं नाही. शहरी भागातील लोकांना घरे देऊ परंतु ते देखील झालं नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. 

शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

संसदेत कही तरुण घुसले त्यांच्या हातात गॅस कांड्या होत्या. त्यांना पकडल गेलं त्याबाबतची माहिती खासदारांना विचारली. त्यावेळी प्रश्न विचारला म्हणून त्यांना 146 खासदारांना संसदेतून निलंबित केलं असल्याचे शरद पवारांनी म्हटले. बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्य नागरिकांचे विषय आहेत. गॅस दर 1100 रुपये झाला आहे. अन्नधान्य महाग झालं असल्याकडे पवारांनी लक्ष वेधले. आपण आता 140 कोटीच्या पूढे गेलो आहोत. यातील 54 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. शेतकऱ्याची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतकऱ्याचा बोजा कमी करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता. मात्र त्यावर काम होतं नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली. एका बाजूने किमंत द्यायची नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर बंधने आणायची त्यामुळं जनता अडचणीत आली आहे. शेतकरी आत्महत्या संख्या लक्षणीय वाढली असल्याचे पवारांनी म्हटले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
Embed widget