एक्स्प्लोर
सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोना, पाच शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवर सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील पाच जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवर सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील पाच जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे तर एक जण स्वयंपाक करणारी महिला आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
मंत्री बाळासाहेब पाटील पॉझिटिव्ह आल्यानंतर कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात हे सहा कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. वरळी डोम इथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता महापालिका सिल्वर ओक परिसरात फिव्हर कॅम्प घेणार आहे.
रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे.
दरम्यान कराड दौऱ्यानंतर हे सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पण त्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला देखील कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.
कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण
राज्यात अनेक मंत्री, नेत्यांना कोरोना
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. कोरोनाविरोधातील लढाईत अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसं अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला. कोरोनाच्या विळख्यातून रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कोरोनाच्या संकटात रस्त्यावर आपलं कर्तव्य बजावणारे पोलीसही सुटले नाहीत. सोबतच ज्या लोकप्रतिनिधींवर कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे, त्या लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. सोबतच मंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, संजय बनसोडे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
सोबतच आमदार महेश लांडगे, आमदार मुक्ता टिळक , राहुल कुल , अभिमन्यू पवार, गीता जैन, सरोज अहिरे, कालिदास कोळंबकर यांच्यासह अन्य काही आमदार व नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून ते बरे होऊन घरी देखील गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement