एक्स्प्लोर

Wardha Lok Sabha 2024: काँग्रेस सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच उमेदवारी; वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

Wardha Lok Sabha 2024: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Sharad Pawar's NCP : शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी (NCP Lok Sabha Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी (Wardha Lok Sabha 2024) काँग्रेससोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेल्या अमर काळेंच्या (Amar Kale) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. 

काँग्रेससोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. या 5 जणांच्या यादीत शरद पवारांनी (Sharad Pawar) यापूर्वी दिलेल्या सरप्राईज नावांवर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंना (Amar Kale) उमेदवारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसचा साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलेल्या अमर काळेंना शरद पवारांनी संधी दिली आहे.  भाजपने नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. निलेश लंके यांनी निकतेच आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नितेश कराळे मास्तरांऐवजी अमर काळेंना संधी 

महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात कराळे मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र आज अखेर नितेश कराळे ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. मात्र यंदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे संधी मिळाली आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे.

कोणाला कोठून उमेदवारी?

वर्धा     - अमर काळे
दिंडोरी   - भास्करराव भगरे
बारामती -सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Embed widget