Sharad Pawar Resignation : मी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नाही: प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation: लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.
LIVE
Background
Sharad Pawar Resignation: पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलीये.. नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पवारांनी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन पर्याय ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आणि म्हणूनच, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, त्यानंतर लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.
पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं म्हणत शरद पवारांनी पाच दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती पण, त्याचीच सुरुवात स्वता: पासून करतील असं कुणालाही वाटलं नसेल. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि पवारांनी भाकरी फिरवली नाही तर तवाच फिरवला, अशी भावना अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली.
पवारांच्या निर्णयानंतर..मुंबईसह राज्यात राजकीय नाट्य रंगलं. पण, संध्याकाळी पावणे सहा वाजता. अजित पवारांनी काकांना संदेश माध्यमांसह कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आणि कार्यकर्त्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं. असं असलं तरी शरद पवारांच्या एका निर्णयानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातला सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? याचीच निवड करण्यासाठी एका समितीची घोषणा झाली आहे. त्यात सुनील तटकरे, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे. आता हीच समिती नवा अध्यक्ष निवडणार आहे.
पण, जेव्हा पवारांनी पद सोडलं तेव्हा यापैकी अजित पवार सोडले. तर प्रत्येकानं पवारांच्या निर्णयांचा विरोध केला आणि जर पवारांनी निर्णय मागे घेतला नाहीत. तर याच समितीसमोर नवा अध्य़क्ष शोधण्याचं आव्हान असणार आहे. विठ्ठल मणियार शरद पवारांचे वर्ग होते. त्यांनी आजच्या निर्णयाच सखोल विश्लेषण केलंय हा निर्णय अचानक घेतलेला नाही साहेबांनी विचाराने हा निर्णय घेतलाय. त्यांची इच्छाशक्ती फार आहे.. राष्ट्रावादीत पुर्णपणे लोकशाहीपणे निर्णय होतो. शरद पवार घेतलेल्या निर्णयाचे परिणाम सहन करतात. त्यांचे निर्णय चांगले ही होतात. आता याच निर्णयाचे पक्षावर काय परिणाम होणार आहे.
महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार पक्षात एकजूटता वाढेल की नाही.. याची उत्तरं पुढील काही काळात मिळेल. पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.आपल्या टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले पवार..असा निर्णय का घेतील..हाच प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याला पडला होता.. दिवसभराच्या घडामोडींनंतर.पवारांनी निर्यणावर विचार करणार असल्याचं अश्वासन दिलं.पण, भाकरी फिरवणार असं म्हणत. पवारांनी तवाच फिरवल्याच्या चर्चांना ब्रेक कसा लागणार आणि ते राजीनामा मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Sharad Pawar Resigns : मी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नाही: प्रफुल्ल पटेल
सध्यातरी मी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही, माझ्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून ती मी योग्य पद्धतीने पार पाडेन असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ नये, त्यांनी धीर ठेवावा असंही ते म्हणाले. आमचा पक्ष एक आहे, एकच राहणार असं ते म्हणाले.
Mumbai News: शरद पवार आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समजूत काढणार
Mumbai News: दरम्यान, YB सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी बोलावलं आहे. शरद पवार त्यांच्याशी चर्चा करून समजूत काढणार आहेत...
Prashant Patil: राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा आपल्या पदाचा राजीनामा
Prashant Patil: राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा आपल्या पदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावं ही पाटील यांंनी ही इच्छा व्यक्त केला.
Sharad Pawar: सिल्वर ओकला चार वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक,जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित
Sharad Pawar: सिल्वर ओकला चार वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे
Vasai News: वसईतील पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
Vasai News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. वसई विरारमधील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पञ लिहून, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही. तर सर्व पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देतील असा इशारा दिला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा इशारा ही दिला आहे.