एक्स्प्लोर

...'तर पुण्यात पुरस्थिती निर्माण होईल!' पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या नदी सुधार प्रकल्पावर शरद पवारांचा आक्षेप 

पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते नदीसुधार प्रकल्पाचे  उद्घाटन झाले आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे.

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे  उद्घाटन झाले आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील नद्यांचं रुपडं बदलून जाईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण होईल, अशी भीती राष्ट्रवादीकडून व्यक्त होत आहे.   
 
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मुठा आणि मुळा या दोन नद्या वाहत आहेत. या नद्यांचं साध्याचं प्रदूषित आणि ओंगळवाणे रूप पालटून त्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी नदी सुधार प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी गुजरात मधील साबरमतीच्या धर्तीवर पुण्यातील मुठा आणि मुळा या नद्याही चकचकीत होतील असं म्हटलं आहे.   

नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या आधीच शरद पवार यांनी या नदीसुधारणा प्रकल्पाला जोरदार आक्षेप घेतला आहे. हा प्रकल्प अंमलात आल्यास पुण्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

नदी सुधार हा प्रकल्प पाच हजार कोटींचा असून 11 टप्प्यांमध्ये तो राबवण्यात येणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नद्यांच्या काठांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून गुजरातमधील साबरमतीच्या धरतीवर नदी पात्रात कायमस्वरूपी पाणी राहील याची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सध्या सुरु असलेले नदी पात्रातील रस्ते बंद करण्यात येणार असून नदीच्या दोन्ही बाजुंच्या खासगी जमिनी देखील अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. 

पाच हजार कोटींची ही योजना महापालिका राबवणार असून त्यासाठी केंद्र सरकार निधी पुरवणार आहे. मात्र, त्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. हाच धागा पकडत शरद पवार यांनी आपण जयंत पाटील यांच्याकडे असलेल्या जलसंपदा विभागाकडूनही याबाबत माहिती घेऊ असं म्हटलंय. या प्रकल्पावरून राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना पर्यावरण अभ्यासकांनी देखील या प्रकल्पामुळे पुण्यात सातत्याने पूरस्थिती निर्माण होईल असं म्हटलंय. 

दरम्यान, या प्रकल्पाबरोबरच पुण्यात जायकाच्या माध्यमातून मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जपानच्या जायका कंपनीने एक हजार कोटींचे अनुदान 2015 मध्ये देऊ केलं होतं. परंतु, मागील सात वर्षांमध्ये हा प्रकल्प सुरूच न झाल्याने त्याची किंमत वाढून चौदाशे कोटींवर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाचंही आज उद्घाटन केलं आहे. परंतु, यावरून सुरु झालेलं राजकारण पाहता हे प्रकल्प खरच पूर्ण होतील का? आणि झाले तर, कधी होतील? असा प्रश्न पुणेकरांच्या मनात निर्माण होत आहे.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: नागपूर हादरलं! एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण
नागपूर हादरलं! एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण
NCP Sharad Pawar On Delimitation Bill 2026: बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल, शरद पवारांची राष्ट्रवादी Delimitation बिलाला पाठिंबा देणार?, बैठकीत Inside Story
बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल, शरद पवारांची राष्ट्रवादी Delimitation बिलाला पाठिंबा देणार?, बैठकीतील Inside Story
Bhandara News: सरकारनं दिवाळीपूर्वी 5 हजार दिले, उपकार केले नाही; भंडाऱ्यात भाजप नेत्याचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले, आम्हाला भीक नको, धानाचा बोनस हवा!
सरकारनं दिवाळीपूर्वी 5 हजार दिले, उपकार केले नाही; भंडाऱ्यात भाजप नेत्याचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले, आम्हाला भीक नको, धानाचा बोनस हवा!
Yavatmal Tree Cutting: यवतमाळमध्ये 50 हजार झाडांवर कुऱ्हाड? रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी अतिरिक्त वृक्षतोडीचा प्रस्ताव; पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
यवतमाळमध्ये 50 हजार झाडांवर कुऱ्हाड? रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी अतिरिक्त वृक्षतोडीचा प्रस्ताव; पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Embed widget