एक्स्प्लोर

Sharad Pawar : आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार

Sharad Pawar : मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.

Sharad Pawar :  रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत. असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते, 

अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज -शरद पवार

युक्रेन हा अतिशय सुंदर देश आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही,  पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) कमी फी मध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. इथे 95 टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे साठ टक्क्यांना प्रवेश मिळतो.पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे. लिबीयातुन त्या वेळी भारतीयांना परत आणण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, ती सगळ्याना माहित आहे. संघर्षामधे आपण कोणाची बाजू घेत नाही. त्यामुळे भारत सरकारच्या याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेबाबत टिका टिपणी करण्याची ही वेळ नाही. असे शरद पवार पत्रकार परिषदे दरम्यान बोलले, 

उद्या काही अडचण आली, तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे
 पुणे (Pune) मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरूड) पर्यंत होणार आहे. पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे.  शरद पवारांनी जलसंपदा विभाग लक्ष घालेल असं म्हटलंयनदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन देखील  पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मी काही इंजीनिअर नाही.  पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे.  उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल.  त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे.

राणे आणि मलिकांना वेगळा न्याय का?
नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्याबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीय.  राजकिय हेतुने मलिकांना अटक केलीय. नवाब मलिक यांचय्वारील कारवाई चुकीच्या पद्धतीने झालीय. नारायण राणेंना देखील अटक झाली होती, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? तसेच नारायण राणे आणि नवाब मलिकांनी वेगळा न्याय का? असा सवाल पवारांनी भाजपला केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget