"22 जानेवारीनंतर मी रामलल्लाचे दर्शन घेणार", शरद पवारांचं श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र
अयोध्येला मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीनंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (NCP) शरद पवारांनी (Sharad Pawar) श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र लिहिले आहे. राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीस चंपत राय यांचे आभार मानले आहे. तसेच 22 जानेवारीनंतर रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल, असा उल्लेख पत्रात केला आहे.
अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं (Ram Mandir Inauguration) आमंत्रण मिळाल्याचे शरद पवार म्हणाले. अयोध्येला मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीनंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त येथील त्यामुळे 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, माझं अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झालं असेल.
रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची रामभक्तांना आतुरता
राम हे श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहे. देशात नाही तर जगभरात रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची रामभक्तांना आतुरता आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त येथील त्यामुळे 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. माझं अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झालं असेल. निमंत्रण दिल्याने शरद पवारांनी आभार मानले आहे. धार्मिक मुद्द्यांवरून लोकांची मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अयोध्येतील जय श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, भाजप आणि आरएसएसकडून मतांसाठी फायदा करून घेतला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Ram Mandir) यांनी केली.
भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा
शरद पवार बोलताना म्हणाले की, मशीदी पाडण्याचा जेव्हा विचार झाला तेव्हा त्याची परवानगी राजीव गांधी असताना झाली. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात शिलान्यास करण्यात आला. यानंतर अनेक लोक न्यायालयात गेल्यानंतर बरीच वर्ष केस न्यायालयात चालली आणि आता अलीकडे निकाल झाला. मात्र, आता राम मंदिराचे काम बाजूला राहिलं आहे. भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे.
अयोध्येच्या विमानांच्या तिकिटात वाढ : शरद पवार
"अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाहीतर, त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहील. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचं काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील.", असंही शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा :