एक्स्प्लोर

Sharad Pawar on Ram Mandir : मशीद पडल्यानंतर राजीव गांधींनी राम मंदिराचा निर्णय घेत शिलान्यास केला; शरद पवारांकडून भाजपला इतिहासाची आठवण

Sharad Pawar on Ram Mandir : आता राम मंदिराचे काम बाजूला राहिलं आहे आणि भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

निपाणी : धार्मिक मुद्द्यांवरून लोकांची मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अयोध्येतील जय श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, भाजप आणि आरएसएसकडून मतांसाठी फायदा करून घेतला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Ram Mandir) यांनी आज केली. ते आज निपाणी (Nipani) दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिर (Ram Mandir) मुद्यावरून भाजप आणि पीएम मोदी यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडले. 

यावेळी बोलताना त्यांनी इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली. शरद पवार बोलताना म्हणाले की, मशीदी पाडण्याचा जेव्हा विचार झाला तेव्हा त्याची परवानगी राजीव गांधी असताना झाली. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात शिलान्यास करण्यात आला. यानंतर अनेक लोक न्यायालयात गेल्यानंतर बरीच वर्ष केस न्यायालयात चालली. आणि आता अलीकडे निकाल झाला. मात्र, आता राम मंदिराचे काम बाजूला राहिलं आहे आणि भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे. 

गरीबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का?

शरद पवार पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरीबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. पीएम मोदी करत असलेल्या दहा दिवसांच्या उपवासावर शरद पवारांनी खोचक शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी दहा दिवस उपवास करत आहेत, त्यांनी तसाच उपवास लोकांची उपासमार घालण्यासाठी सुद्धा करावा अशी टीका त्यांनी केली.

शरद पवार यांनी यावेळी बोलताना त्यांनी  घेतलेल्या कार्यकाळातील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. मात्र, आज देखील शेतकरी कर्जामध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही. या देशांमध्ये उद्योगपतींची कर्ज माफ होतात, मात्र शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत. देशात चुकीची आर्थिक धोरणे राबवली जात आहेत. या चुकीचं धोरण राबवऱ्यांना लोकांना बाजूला केले पाहिजे, असेही ते म्हणाले. कर्नाटकमधील निकाल हा विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसला होता तसाच उत्साह आज दिसत आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत उत्तम पाटील हे आगामी निवडणुकीत आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. काळ बदलला आहे, देशातील परिस्थिती वेगळी आहे. कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला होता. आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे. महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात.  महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कारGadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special ReportABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 26 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
Embed widget