Sharad Pawar Health: शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे, लतादिदींकडून विचारपूस
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. येत्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, ब्रीच कँडीमध्ये शरद पवारांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
Kind attention
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021
Our party president Sharad Pawar saheb was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening and was therefore taken to Breach Candy Hospital for a check up.
Upon diagnosis it came to light that he has a problem in his Gall Bladder.
शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, श्री शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.
Got to know about the health of Shri Sharad Pawar ji.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 29, 2021
Wishing him a speedy recovery & good health!
श्री शरद पवार जी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले.
त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.
शरद पवार यांच्या ट्विटरवरुन सांगितलं आहे की, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! तसेच देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती घेतली, असंही शरद पवारांच्या ट्विटर हॅन्डलवरुन सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
शरद पवार यांच्या ट्विटरवरुन सांगितलं आहे की, माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!, असं पवारांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.
माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.@mangeshkarlata
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
अमित शाह यांची भेट घेतली होती
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्याच्या आणि देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे, तर काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचंही पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :