एक्स्प्लोर

'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत', शरद पवारांसोबत बैठकीसंदर्भात अमित शाहांचं सूचक वक्तव्य

अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधल्या गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही भेट अमित शाह आणि शरद पवार यांच्यात झाल्याचं बोललं जात आहे. अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधल्या गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही. 

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी गुजरातमध्ये नेमकी कुणाची गुप्त भेट घेतली? अमित शाह की गौतम अदानी? महाराष्ट्राच्या राजकारणात अँटिलिया- वाझे प्रकरणावरुन गदारोळ सुरु असताना शरद पवारांची पावलं गुजरातकडे का वळाली? या प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. दैनिक भास्करच्या गुजराती आवृत्तीनं तर पवारांची ही भेट अमित शाहांसोबतच होती असा दावा केला आहे.

'अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले', संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

संसदेचं अधिवेशन गुरुवारी गुंडाळलं गेलं. त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत शरद पवार दिल्लीतच होते. तिथून ते पहिल्यांदा जयपूरला गेले. तिथे जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आणि नंतर जयपूरहून अहमदाबादला. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेदहापर्यंत शरद पवार अहमदाबादमध्ये होते, अशी माहिती मिळतेय. योगायोग म्हणजे याच दिवशी अमित शाहसुद्धा अहमदाबादमध्ये होते. 

ही भेट गुप्त राहावी यासाठी ती अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. भेटीबाबत दोन थेअरी मांडल्या जात आहेत. एक थेअरी अशी की ही भेट गौतम अदानींसोबत होती. तर दुसरी चर्चा ही भेट अमित शाहांसोबत होती. पण अशा काही भेटी झाल्याचं अधिकृतपणे अद्याप तरी कुणी मान्य करायला तयार नाहीय. 

Nana Patole | शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे तपासण्याची गरज : नाना पटोले

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अँटिलिया, वाझे परमबीर असे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होतायत. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीचं टायमिंग महत्वाचं आहे. राज्यातला सध्याचा वाद हा गृहमंत्रालयाशी संबंधित आहे आणि अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ही गुप्त भेट झाली असं मान्य केलं तर त्यातून अजून एक महत्वाचा अर्थ निघतो. 2014 नंतर पवार-मोदींच्या अनेक वेळा भेटी झाल्या आहेत. पण जी केमिस्ट्री पवार-मोदींमध्ये आहे ती पवार-शाहांमध्ये कधीच दिसलेली नाहीय. 

किंबहुना अमित शाहांच्या कार्यशैलीबद्दलची शरद पवारांची नाराजी जाहीर मुलाखतींमधून प्रकट झालेली आहे. हे सगळं लक्षात घेता जर पवार शाहांना भेटले असतील तर त्याचं महत्व अधिक वाढतं. अशी काय मजबुरी आली की शरद पवारांना अमित शाहांची भेट घ्यावी लागली, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. 

राजकारणात एखाद्या भेटीनं लगेच नवी समीकरणंच मांडली जातील असं नाही.पण एखाद्या राजकीय नात्यात आईसब्रेकर म्हणून अशा मुलाखती महत्वाच्या ठरतात. त्यामुळे लगेच एका भेटीनं राजकीय भूकंप घडेलच असं नाही. पण अशा घडामोडींत भविष्यातल्या हालचालींचा वेध असतो. 

महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या वेळी सुद्धा भाजप-राष्ट्रवादीच्या गुप्त भेटींची चर्चा रंगली होती. आता महाविकास आघाडी एका संकटातून जात असतानच पुन्हा अशा भेटींची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात व्हाया गुजरात काही नवी समीकरणं दिसतात की शरद पवारांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अशा भेटींमधून ते फक्त चकवा, हूल देऊ इच्छितात हे लवकरच कळेल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget