शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत चुकीचं काही नाही : संजय राऊत
देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला.
महाविकास आघाडीला काहीही धोका नाही, सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने काम करत आहे. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री तर आहेतच, ते आमच्या पक्षाचे प्रमुख देखील आहेत. त्यांना आम्ही भेटतो तेव्हा देशातील आणि राज्यातील राजकारणावर चर्चा होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
गुजरातमध्ये शरद पवारांच्या गुप्त भेटीमागचा नेमका अर्थ काय? भेट नेमकी कुणासोबत?
काँग्रेसकडून भेटीवर प्रश्न उपस्थित
जर देशाचे गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्यासोबत बैठक घेत असतील तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेणे नागरिकांचा हक्क आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचित झाली हे देशाला कळायला हवं."
'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत', शरद पवारांसोबत बैठकीसंदर्भात अमित शाहांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीची भाजपवर टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुप्त बैठकीच्या बातमीबद्दल म्हटलं की, "गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही.
भेटीच्या बातमीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. शरद पवार -अमित शाह या दोघांमध्ये कोणतीही बैठक झाली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल जयपूर थेट मुंबईत परतले होते.