एक्स्प्लोर

Sharad Pawar : शरद पवार गटाचं नाव ठरलं, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार" नवं नाव!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी केली होती. 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला  (Sharad Pawar) केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला  (Election Commission Of India)  काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव त्यांना दिलं आहे. 

शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला, त्यातील राष्ट्रवादी हे नाव, आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे मिश्रण या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळे या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेला असल्याची माहिती मिळत आहे.

वटवृक्ष चिन्हासाठी पवार गट आग्रही

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आलं आहे. 

शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे. 

येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे. 

अजित पवारांसोबत किती आमदार? 

- महाराष्ट्रातील 41आमदार 
- नागालँडमधील 7 आमदार 
- झारखंड 1 आमदार 
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5 
- राज्यसभा 1 

शरद पवारांसोबत किती आमदार? 

- महाराष्ट्रातील आमदार 15 
- केरळमधील आमदार 1
- लोकसभा खासदार 4 
महाराष्ट्र विधानपरिषद 4
- राज्यसभा - 3

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
Embed widget