एक्स्प्लोर

Sharad Pawar : 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एन्ट्री, येवल्यात इतिहास घडणार?

Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) येवला दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा सातारा सभेची आठवण ताजी झाली आहे.

Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) येवला दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा सातारा सभेची आठवण ताजी झाली आहे. सभास्थळाकडे जात असताना पावसाने हजेरी लावली. या पावसातच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत असताना पावसात भिजल्याचा फोटो समोर आला आहे. भिजलेल्या अवस्थेत गाडीत बसले असतानाचा पवारांचा फोटो राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राज्याच्या राजकारणात सन 2019 विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सातारा येथे शरद पवारांनी कोसळत्या पावसात सभा घेतली होती. ती सभा प्रचंड गाजली होती. पवारांचं पावसात भीजत केलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. पावसातही सभेचा व्हीडिओ पुढे कित्येक दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत होता. आताही असाच प्रसंग समोर आला असून येवला (yeola) येथील सभेच्या ठिकाणी जात असताना पाऊस सुरु झाला. या पावसातच शरद पवार स्थानिक नेते कार्यकर्त्यांना भेटत होते. यामुळे ते पावसात भिजले. त्यांचा तो फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या सोशल हँडलवर शायराना कॅप्शनसह शेअर केला आहे. त्यामुळे काही मिनिटांतच तो व्हायरल झाला आहे. 

राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नऊ आमदारांना सोबत घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. ते येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करत असून आज येवल्यात पहिली जाहीर सभा आहे. सभेला जाताना पवार पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं. मागच्या वेळी पवार जेव्हा पावसात भिजले, तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात दिसला होता. आता पुन्हा एकदा तसाच परिणाम होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून फोटो ट्विट 

दरम्यान पावसात भिजलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सुरवातीला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. "भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं ना थका हूँ ना हारा हूँ रण में अटल तक खडा हूॅं मैं" अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर केला आहे. तर रोहित पवार यांनी ‘मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे… मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे….असे लिहित शरद पवार यांचा फोटो पोस्ट केला आहे. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेरे हर एक वार का पलटवार हू....असे कॅप्शन दिले आहे. तर“ आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची! असे कॅप्शन दिले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget