दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळे चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच, वाईट वाटायचं कारण नाही; शरद पवारांचं थेट वक्तव्य
Sharad Pawar: दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळं चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे. सगळे मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली.

Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या मिलनाची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकत्र येण्यावर चर्चा केली जात असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्यावरती भाष्य केलं. त्यामुळे राजकीय भूवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळं चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे. सगळे मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली. त्यामुळे काका पुतण्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज सकाळी पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर विचारणा केली असता वरील प्रतिक्रिया दिली. दरम्यान महाराष्ट्रामध्ये सक्तीच्या हिंदी करणाविरोधात एल्गार सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक राजकीय नेत्यांपासून अगदी राजकीय पक्षांपर्यंत हिंदीविरोधात दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बघून घेतो राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर सुद्धा भाष्य केलं.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर सुद्धा भाष्य केलं
दरम्यान, हिंदी सक्तीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले की पहिली ते चौथी हिंदी सक्तीची गरज नाही. पाचवीपासून हिंदी येणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी नमूद केलं. हिंदीला दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की दोन्ही ठाकरेंची भूमिका मी वाचली असून मुंबईला गेल्यानंतर याबाबत भेटीगाठी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचा आवाहन केल्याच्या या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की त्यांनी मोर्चा सहभागी व्हा असं म्हटलं आहे. त्यांचं भाष्य समजून घेतलं आहे. मात्र, तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर सहभागी होता येत नाही. भूमिका समजावून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, असं शरद पवार यांनी नमूद केलं. पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको असं माझं म्हणणं असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या

























