एक्स्प्लोर

नारायण राणेंच्या आत्मचरित्राला शरद पवारांची प्रस्तावना, प्रकाशनालाही पवारांची प्रमुख उपस्थिती

विशेष म्हणजे राणेंच्या मराठीतील पुस्तकाला खुद्द शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर, तिकडे राणे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यात भेट झाली. त्यामुळे एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना राणेंच्या या भेटींनी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला शरद पवार यांनी प्रस्तावना दिली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्य उपस्थिती आहे. 16 ऑगस्टला पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मुंबईत होणार आहे. राणेंची भाजपशी सलगी असूनदेखील मुख्यमंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाला वेळ दिलेली नाही. विशेष म्हणजे राणेंच्या मराठीतील पुस्तकाला खुद्द शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर, तिकडे राणे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात भेट झाली. त्यामुळे एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना राणेंच्या या भेटींनी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ दिलेला नाही आणि शरद पवार मात्र उपस्थित राहणार असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळी राजकीय समीकरण जुळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागचं कारण आपण आत्मचरित्रातून उलगडणार असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर आत्मचरित्रातून अनेक गुपितांवर प्रकाश टाकला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे.  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक काहीही मतभेद नाहीत. त्यांच्याशी असलेले मतभेद वैचारिक आहेत. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला तेदेखील आपण आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे असेही नारायण राणेंनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर माझ्या आत्मचरित्रात मी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या सगळ्या पक्षांमधल्या प्रवासाबाबत लिहिलं आहे असंही राणे यांनी स्पष्ट होतं. त्यामुळे या आत्मचरित्रात नेमकं काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नारायण राणे यांनी 1972 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम कर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली. आता ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Embed widget