एक्स्प्लोर
...तर शेतकरीच फडणवीस सरकारला इंगा दाखवेल : शरद पवार
पनवेल (रायगड) : कर्जमाफी मागण्याची इच्छा शेतकऱ्यांची नसते, शेतकरी घेतलेले कर्ज परत करण्यासाठी धडपडत असतो. मात्र, आज त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळा. टिंगल उडवू नका. अन्यथा शेतकरी सरकारला इंगा दाखवेल, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आज रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये समारोप झाला. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
विदर्भातही प्रचंड प्रतिसाद
"गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा हे सर्व पक्षांनी महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यांतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षयात्रा काढली. काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलं की, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, तिथून यात्रेत प्रतिसाद मिळणार नाही. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिंडी काढली असताना, लाखोंच्या संख्येने शेतकरी उभे राहिले.", असे शरद पवार यांनी सांगितले.
आमदारांच्या निलंबनावरुन पवार कडाडले !
महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्पावेळी कर्जमाफीसाठी आवाज उठवणाऱ्या आमदारांचं निलंबन राज्य सरकारने केलं होतं. या मुद्द्यावर बोलताना शरद पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी महाराष्ट्रच्या विधानसभेत भूमिका मांडतात. मुलभूत प्रश्नांसाठी भूमिका मांडण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे."
मनमोहन सरकारला शक्य, मग मोदी सरकारला का नाही?
"मी कृषीमंत्री असताना त्यावेळी आत्महत्येची माहिती ऐकल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह अस्वस्थ झाले. वर्धा, यवतमाळमध्ये ज्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही दोघांनी भेट घेतली. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी तयारी दाखवली आणि 71 हजार कोटींचं कर्ज एकमताने माफ केलं. मग मनमोहन सिहांचं सरकार करु शकतं, तर मोदी सरकार का नाही?" असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला विचारला.
शेतकऱ्यांनो, जीव द्यायचा नाही !
शेतकऱ्यांनो, जीव द्यायचा नाही. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. राज्यकर्त्यांनी आमचं ऐकलं नाही, तर आम्ही त्यांचं जगणं हाराम करु, असं शेतकऱ्यांना उद्देशून शरद पवारांनी म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement