Sharad Pawar : 'मी काय म्हातारा झालोय का?' म्हणत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
Sharad Pawar : 'मी काय म्हातारा झालोय का?' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे. शरद पवार पुण्यातील पुरंदर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी पोहोचले होते.
Sharad Pawar : 'मी काय म्हातारा झालोय का?' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे. शरद पवार पुण्यातील पुरंदर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवारांच्या तब्येतीची काळजी करत साहेबांनी बाहेर फिरु साहेबांनी बाहेर फिरू नये, असं सांगितलं. यावर शरद पवार यांनी मिश्किल उत्तर देत 'मी काय म्हातारा झालोय का?' असं कार्यकर्त्याला विचारलं.
'मी काय म्हातारा झालोय का?'
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परींचे गावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवारांच्या तब्येतीची काळजी करत साहेबांनी बाहेर फिरु साहेबांनी कुठंही फिरू नये एका जागेवर बसून रिमोट फिरवावा, अशी मागणी एका वयोवृद्ध पदाधिकारी यांनी केली. यावर मी अजून म्हातारा झालो नाही, अशी मिश्किल टिप्पणी पवारांनी केली.
यावेळी पवारांनी म्हटलं की, 'अतिवृष्टी झाल्यानंतर राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना करायला पाहिजे ती उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. ज्यांच्या हातात केंद्राची सूत्रे आहेत. ते ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जेव्हा माझ्याकडे केंद्राची सूत्र आली तेव्हा शेतकऱ्यांची 72 हजार कोटींची कर्ज माफी आम्ही केली. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी उपयुक्त ठरतील म्हणून मी इथे शेतकऱ्यांसोबत संवाद करण्यासाठी आलो आहे.'
शरद पवारांनी म्हटलं की, पुरंदरमधील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. पुरंदरचे लोक आधी गिरणी कामगार म्हणून जायचे. आता तशी परिस्थिती नाहीय. शेतीचे प्रश्न सुटले नव्हते म्हणून सन्मानाने जगण्यासाठी पुरंदरमधील लोकांनी विविध व्यवसाय केले. आता इथे लोक शेती करू लागले आहेत. व्यवसाय करू लागले आहेत. आधी लोकांना भेटायचं म्हटलं तर रोजगार हमीची काम सुरू करा अशी मागणी व्हायची. आता कारखान्याची मागणी करीत आहेत. म्हणजे चित्र बदलत आहे.