Shambhuraj Desai : मी गोपनीयतेची शपथ घेतलीय, काही बोलणार नाही; अजित पवार-गिरीश महाजनांच्या वादावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया
Ajit Pawar Vs Girish Mahajan : मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम द्यायच्या आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, मी त्याचा आढावा घेतलाय अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबई: मी मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं हे सांगणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या मागणीवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि गिरीश महाजनांचा वाद झाल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना शंभुराज देसाईंनी ही सावध प्रतिक्रिया दिली.
आपल्या खात्याला अधिकचा निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजनांनी अजित पवारांकडे केली होती. त्यावर संतापलेल्या अजित पवारांनी आता काय जमिनी विकून निधी देऊ का असा सवाल केला होता. त्यावर आज शंभूराज देसाई यांना विचारलं असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
तेव्हा मराठा आरक्षण का नाही दिलं?
मराठा आरक्षणावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, पवारसाहेब यांनी राज्याचे तीन वेळा नेतृत्व केलं, मग तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही हा केद्रीय मंत्री अमित शाह यांचा आरोप योग्य आहे. सुप्रीम कोर्टात त्यांच्या सरकारने बाजू का मांडली नाही? आपल्या सरकारन केला कायदा, आरक्षण टिकवलं. मात्र दुसरं कोणाचं सरकार आलं की आरक्षण का टिकत नाही.
मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम देण्याआधीच प्रश्न सुटेल, मी मराठा आरक्षणाचा आढावा घेतला आहे असं शंभूराज देसाई म्हणाले. शिंदे समितीला मुदत वाढीच्या सूचना दिलेल्या आहेत, नोंदी तपासण्याचं आमचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले. कुणाचाही अपमान होणार नाही अशा संसदीय भाषेत मनोज जरांगे यांनी वक्तव्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.
राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद झाल्याच्या बातम्या आहेत. त्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, कॅबिनेट मंत्रिपदाची शपत घेताना मी गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे बैठकीत काय झालं हे गोपनीय आहे, मी त्यावर बोलू शकत नाही.
अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, अशा संवेदनशील प्रकरणामध्ये आता काही गोष्टी उघड करणे योग्य नाही, योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील.
ही बातमी वाचा: