एक्स्प्लोर

Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं

माझा राजा रं.. माझा शिवबा रं... असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची, रयतेच्या राजाची महती गाण्यात आलीय.

कोल्हापूर  : राजर्षि शाहू महाराजांचा वारसा हा छत्रपतींच्या रक्तातच आहे, हे आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपतींच्या एका कृतीने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय. विशाळगड (vishalgad) अतिक्रमण मोहिमेतून झालेल्या हिंसाचारावर परखड भूमिका घेत स्वत:च्या पुत्राचा, संभाजीराजे (Sambhajiraje) छत्रपतींचा जाहीर निषेध नोंदवत शाहू महाराज छत्रपतींनी सर्वांची मनं जिंकली होती. त्यानंतर, आज विशाळगडावरील भेटीदरम्यान, भरपावसात (Rain) भिजत असलेल्या चिमुकलीला पाहून आपल्या अंगावरील जॅकेट शाहू छत्रपतींनी काढून त्या चिमुकलीच्या अंगावर घातलं, महाराजांनी मायेची ऊब त्या चिमुकलीला दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर, महाराजांच्या या कृतीने उपस्थितांनाही गहिवरुन आलं.  

माझा राजा रं.. माझा शिवबा रं... असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची, रयतेच्या राजाची महती गाण्यात आलीय. तर, आरक्षणाच्या माध्यमातून समाजातून दूर फेकलेल्या आणि वंचितांना आपलसं करुन राजर्षि शाहू महारांजांनी समानतेचा इतिहास रचलाय. राजा हा अवघ्या रयतेचाच असल्याचं शाहू महाराजांनी जगाला दाखवून दिलं. त्याच, राजर्षि शाहू महाराजांचा वारसा चालवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या कृतीने अनेकांना राजर्षि शाहू महाराजांची आठवण झाली. कारण, विशाळगडावरील पाहणीदरम्यान गजापूर या ठिकाणी गेल्यानंतर शाहू महाराजांनी स्वतःच्या अंगावरील जॅकेट काढून चिमुकलीच्या अंगावर चढवले,  जोरदार वारा आणि पाऊस पडत असताना गजापुरातील महिला, चिमुकली मुलं शाहू महाराजांना भेटून कालची घटना सांगत होते. त्यावेळी, पावसात भिजणारी आणि कुडकुडणारी चिमकुली पाहून महाराजांनी नकळत आपल्या अंगावरील जॅकेट काढले अन् चिमुकलीला मायेची उब म्हणून परिधान केले. शाहू महाराजांच्या या कृतीने उपस्थितही गहिवरल्याचं पाहायला मिळालं. 

विशाळगडावर भेट देऊन केली पाहणी  

विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील  राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची पाहणी केली होती. या भेटीत शाहू महाराजांनी विशाळगडावरील मुस्लीम बांधवांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. शाहू महाराजांनी आज विशाळगडाला भेट दिल्याचं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही सांगितलं आहे. किल्ले विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून कोल्हापूरकर बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील याची खात्री आहे, असे शाहू महाराजांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget