धक्कादायक! मुंबईच्या खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग, परिसरात संतापाची लाट
Sexual Assault Case : बदलापूर (Badlapur) येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या खार दांडा परिसरात देखील अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे.
![धक्कादायक! मुंबईच्या खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग, परिसरात संतापाची लाट Sexual Assault Case in Mumbai Khar two minor girls were molested by a neighbor molestation case maharashtra was shaken by the incident of atrocities crime marathi news धक्कादायक! मुंबईच्या खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग, परिसरात संतापाची लाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/21/d007297391bbbfe3b6614226316ad1611724237977492892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sexual Assault Case Mumbai : बदलापूर (Badlapur) येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या खार दांडा परिसरात देखील अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात दोन सख्या अल्पवयीन मुलींचां विनयभंग (Sexual Abuse) झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन सिंग असून तो फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे.सध्या खार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय?
कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर शहरात घडली. बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या दोन दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरण पुढे आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे राजकारणही आता तापू लागले आहे. तर दुसरीकडे, बदलापूरच्या अत्याचाराच्या प्रकरणाला अवघे काही तास उलटत नाही तोच बदलापूर पाठोपाठ (Badlapur Crime) राज्यात पुणे, अकोला, ठाणे, मुंबईच्या खार येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.
अकोल्यात विद्यार्थीनींला अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार
बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकाराने जिल्ह्याभरात संताप व्यक्त होत आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)